शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 19:44 IST

विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात टोकाचा वाद होता. हा वाद दिल्ली हायकमांडजवळही पोहचला होता. 

मुंबई - महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला आहे. लवकरच मविआचं जागावाटप जाहीर होईल. या जागावाटपात काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे. काँग्रेस १०५-११०, शिवसेना ठाकरे ९०-९५ तर शरद पवारांची राष्ट्रवादी ७५-८० जागा लढवण्याची शक्यता आहे. २०१९ च्या निकालानंतर राज्यातील राजकारण बदललं. याआधी प्रमुख ४ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते, तेव्हा युती आणि आघाडीत प्रत्येक पक्ष १०० पेक्षा जास्त जागा लढवत होता. मात्र पहिल्यांदाच शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला १०० पेक्षा कमी जागांवर लढावं लागत असल्याचं चित्र दिसून येते. 

विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात टोकाचा वाद होता. हा वाद दिल्ली हायकमांडजवळही पोहचला. हरियाणा निकालानंतर धडा घेतलेल्या काँग्रेसनं महाराष्ट्रात चूक नको, यासाठी लवकरात लवकर हा वाद मिटवण्याचे नेत्यांना आदेश दिले. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांना मविआतील समन्वयासाठी जबाबदारी देण्यात आली. बाळासाहेब थोरात यांनी आज शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर उद्धव ठाकरेंच्याही भेटीला पोहचले. मविआची दुपारपासून जागावाटपावर बैठक सुरू आहे. त्यात जागावाटपाचा तिढा सुटल्याचं कळतंय. 

२०१९ नंतर बदललं राज्यातलं राजकारण

गेल्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा महायुतीला जनतेनं कौल दिला होता. मात्र मुख्यमंत्रि‍पदावरून या दोन्ही पक्षात बिनसलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणलं. त्यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा राजकीय भूकंप झाला. त्यात शिवसेना-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या भूमिकेमुळे शिवसेना-राष्ट्रवादीचे २ गट तयार झालेत. त्यात एक गट भाजपासोबत महायुतीत तर दुसरा काँग्रेससोबत महाविकास आघाडीत आहे. यंदाची लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहे.

४ महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मिशन ४५ चं स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला राज्यात केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ९ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८ जागा जिंकता आल्या. आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी  ताकदीनं महायुतीविरोधात मैदानात उतरली आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरच्या निकालात कोण बाजी मारते हे येणारा काळ ठरवेल.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस