Maharashtra Election 2019 will take decision with congress about supporting shiv sena says ncp chief sharad pawar | महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत शरद पवार म्हणाले, 'आता घाई नाही!'

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत शरद पवार म्हणाले, 'आता घाई नाही!'

मुंबई: दिवसभर भेटीगाठी, बैठकांचं सत्र सुरू असूनही काँग्रेस, राष्ट्रवादीनं शिवसेनेसोबत जाण्याविषयी कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. एनडीएतून बाहेर पडलेल्या, मोदी सरकारमधील मंत्रिपदं सोडून आलेल्या शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीनं वेटिंगवर ठेवलं आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानं आमच्याकडे बराच वेळ आहे. त्यामुळे शिवसेनेबद्दल निर्णय घ्यायला बराच अवधी असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचेशरद पवार यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरवर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रपती राजवट लागू करुन राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे. त्यामुळे शिवसेनेबद्दल आम्ही सवडीनं निर्णय घेऊ, असं शरद पवारांनी सांगितलं. काँग्रेस, राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढवलीय. त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्याबद्दलचा निर्णयदेखील एकत्रच घेऊ, असं पवार म्हणाले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या विचारसरणीत फरक आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रमांसह अनेक मुद्यांवर चर्चा गरजेची असल्याचंदेखील पवार यांनी म्हटलं. 

शरद पवारांसोबत चर्चा करण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आलेले काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी पत्रकार परिषदेत राज्यपालांच्या कारभारावर सडकून टीका केली. ‘राज्यपालांकडून मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करून मनमानी सुरू आहे. राज्यपालांनी बहुमताचा दावा करण्यासाठी भाजपा, शिवसेनेसह राष्ट्रवादीला निमंत्रित केलं. मात्र काँग्रेसला आमंत्रण देण्यात आलं नाही. राज्यपालांची ही कृती चुकीची आहे,’ असं पटेल म्हणाले. शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला आहे. याबद्दलचा निर्णय राष्ट्रवादीशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Election 2019 will take decision with congress about supporting shiv sena says ncp chief sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.