शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

...म्हणून 'लाव रे तो व्हिडीओ'ची हवा झाली, 'इम्पॅक्ट' नाही; यावेळी 'राजनीती' बदलणार!

By अमेय गोगटे | Published: October 09, 2019 3:53 PM

Maharashtra Election 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडा, हा राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम होता.

ठळक मुद्देराज ठाकरे ९ ऑक्टोबरपासून प्रचारसभांचा धडाका सुरू करणार आहेत. 'ए लाव रे तो व्हिडीओ' या वाक्याने लोकसभा प्रचाराच्या रणधुमाळीत धुमशान केलं होतं. यावेळी ईडी नोटीस हे राज ठाकरेंचं प्रमुख अस्त्र असू शकतं.

काय करूया, लढूया की नको, यावर अगदी शेवटपर्यंत विचार करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अखेर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. त्यामुळे मनसैनिकांमध्ये एक वेगळाच जोश पाहायला मिळतोय. ते स्वाभाविकही आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते संभ्रमातच पडले होते. आपण जे करतोय, ते कुणासाठी, कशासाठी हेच त्यांना कळत नव्हतं. लोकांच्या वरातीत नाचत असल्यासारखंच त्यांना वाटत होतं. पण यावेळी 'घरचं कार्य' असल्याने ते खूश आहेत. त्यांचा हा उत्साह वाढवण्यासाठी राज ठाकरे प्रचारसभांचा धडाका सुरू करणार आहेत. त्यांच्या प्रचाराबद्दल विशेष उत्सुकता आहे. त्याचं कारण म्हणजे, लोकसभा निवडणुकीत गाजलेली 'ए लाव रे तो व्हिडीओ' ही सीरिज. या मालिकेची चर्चा खूप झाली, टीआरपीही जोरदार मिळाला, पण तिचा आशय खरंच तगडा होता का आणि तिनं अपेक्षित परिणाम साधला का, या प्रश्नाचं उत्तर सरसकट 'हो' असं देता येणार नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडा, हा राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम होता. त्यासाठी त्यांनी राज्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या. आश्चर्य म्हणजे, मनसेच्या स्थापनेनंतर त्यांनी कधी पक्षाच्या प्रसारासाठीही राज्यभर जाऊन सभा घेतल्या नव्हत्या. त्यामुळे ते अचानक एवढे का सक्रिय झालेत, असा प्रश्न सुरुवातीला अनेकांच्या मनात आला होता. पण नंतर, 'माहौल हम बनाएंगे' म्हणत आपल्या नेहमीच्या स्टाईलने राज ठाकरेंनी वातावरण बदलून टाकलं होतं. 'ए लाव रे तो व्हिडीओ' या वाक्याने प्रचाराच्या रणधुमाळीत धुमशान केलं होतं. नरेंद्र मोदींच्या जुन्या भाषणांच्या क्लिप्स, वर्तमानपत्रातील कात्रणं, हरिसाल गावचा तरुण, 'मी लाभार्थी'च्या जाहिरातीत फोटो वापरलेलं - पण लाभार्थी नसलेलं कुटुंब हे सगळं त्यांनी स्टेजवरून दाखवलं होतं आणि मोदी सरकारनं कसं फसवलं हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला सगळ्यांनाच हे 'भारी' वाटलं. कारण, प्रचाराची ही स्टाईल नवी होती आणि त्याला राज ठाकरेंच्या वक्तृत्वाची, वलयाची जोड होती. पण, कालांतराने त्यात तोच-तोचपणा येत गेला आणि त्या पडद्यामागचं वस्तुस्थितीही मतदारांच्या लक्षात आली.

प्रत्येक कार्यक्रमाचं एक औचित्य असतं. त्यानुसारच तिथे बोलावं लागतं, हे राज ठाकरेंसारख्या वक्त्यालाही ठाऊक आहेच. राजकारणात तर असं अनेकदा पाहायला मिळतं. शरद पवारांच्या सत्काराच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी पवारांचा गुणगौरव करणं स्वाभाविकच आहे. पण म्हणून निवडणूक प्रचारातही ते तसंच बोलतील का? नक्कीच नाही. पण, राज ठाकरेंनी हे दोन व्हिडीओ पाठोपाठ दाखवून मोदींचा दुटप्पीपणा दाखवून देण्याची 'राजनीती' केली. ती थोड्याच दिवसांत जनतेला उमगली. जवानांपेक्षा व्यापारी जास्त जोखीम घेतात, हा व्हिडीओही याच गटात मोडतो, असं म्हणावं लागेल. कारण, जवानांबद्दल मोदींना आस्था नाही असं वाटावं अशी कृती मोदींनी पाच वर्षांत केली नव्हती. 

राजकीय भूमिका बदलणंही राजकारणात नवं नाही. राज ठाकरे स्वतः नरेंद्र मोदींबद्दल काय बोलायचे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल काय बोलायचे आणि सध्या त्यांची भूमिका काय आहे, हे सगळेच पाहताहेत. त्यामुळे जीएसटीबद्दलची भूमिका मोदींनी नंतर बदलली, हा व्हिडीओही तितकासा प्रभावी ठरला नाही. सभांमध्ये या व्हिडीओला टाळ्या आणि शिट्यांनी प्रतिसाद मिळाला, पण मनसैनिकांव्यतिरिक्त इतरांनी तो कितपत गांभीर्याने घेतला हा प्रश्नच आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल संशय व्यक्त करणं, एअर स्ट्राईकवरून अजित डोवालांना लक्ष्य करणं हे तर अनेक मनसैनिकांनाही 'मनसे' पटलं नव्हतं. त्यामुळेच 'लाव रे तो व्हिडिओ'चा म्हणावा तसा 'इम्पॅक्ट' झाला नाही. 

राज ठाकरेंचं ठरलंय?  

लोकसभेला मनसेचे उमेदवारच रिंगणात नसल्याने गर्दीचं रूपांतर मतांमध्ये झालं नाही, असा दावा मनसैनिक करतात. तो अगदीच चुकीचा नाही आणि म्हणूनच यावेळी राज ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण, यावेळी ते आपल्या हक्काच्या उमेदवारासाठी मतं मागणार आहेत. ती कोणत्या मुद्द्यावर मागतात, सरकारवर कसा हल्ला करतात, काय आश्वासनं देतात, याबद्दल उत्सुकता आहे. 

मनसेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी नोटीस हे राज ठाकरेंचं प्रमुख अस्त्र असू शकतं. कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी राज ठाकरेंना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यांची साडेआठ तास चौकशीही करण्यात आली. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. भाजपा ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप सर्वच विरोधकांनी केला आहे. हाच राज यांच्या भाषणातील महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. फक्त, ते आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीऐवजी मतदारांना भावनिक साद घालू शकतात. लोकसभेवेळी त्यांनी ज्या प्रकारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर थेट हल्ला चढवला, त्याऐवजी ते या दोघांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधतील, असंही बोललं जातंय. 

अर्थात, विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी थोडं अधिक नियोजन, आखणी करणं गरजेचं होतं, असं राजकीय जाणकारांना वाटतंय. ईडी नोटिशीनंतर ते सक्रिय होतील असं वाटत होतं. अशा कितीही चौकश्या केल्या, तरी तोंड बंद करू शकणार नाही, या त्यांच्या विधानाने मनसैनिकांना ताकद दिली होती. पण नंतर ते अगदीच गप्प झाले. आता 'स्लॉग ओव्हर्स'मध्ये त्याच बॉलवर षटकार ठोकून ते बाजी मारतात का, हे पाहावं लागेल!

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय