शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

Maharashtra Election 2019 : चाललंय काय, अन् तुम्ही बोलताय काय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 4:40 AM

शरद पवार यांचे आणि सुशीलकुमार शिंदे यांचे मैत्रीचे नाते तमाम मराठी माणसाला माहीत आहे.

- वसंत भोसलेकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी ऐन निवडणुकीत विरोधकांच्या हाती आयतं कोलित दिलं. वेगवान प्रसार माध्यमांनी योग्य फायदा उठवित चर्चा भलतीकडे लावून दिली. ‘होय, काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाची गरज आहे, या वक्तव्यावर मी ठाम आहे,’ असे सांगत दोन्ही काँग्रेस आघाडी करून लढत राहण्याने थकले आहेत, शिंदे यांच्या या वक्तव्याने विरोधकांना प्रचारात मुद्दा मिळाला. ऐन निवडणुकांच्या प्रचारात असे काही बोलायची गरज होती का? काँग्रेसचा आणि राष्टÑवादी काँग्रेसचा इतिहास पाठ असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मुद्दा चुकीचा नाही; मात्र वेळ चुकली.

शरद पवार यांचे आणि सुशीलकुमार शिंदे यांचे मैत्रीचे नाते तमाम मराठी माणसाला माहीत आहे. शरद पवार यांच्याच पुढाकाराने त्यांनी पोलिसाची वर्दी उतरवून राजकीय कपडे परिधान केले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या मंत्रिमंडळात अनेकवेळा काम केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात एकमेकांचे सहकारी होते. श्रीमती सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा पुढे करून शरद पवार यांनी राष्टÑवादी काँग्रेसची स्थापना केली. स्वतंत्र लढले. पण तीनवेळा एकत्र येऊन आघाडीचे सरकार चालविले. त्यात शिंदे यांनाही संधी मिळाली होती. एकदाचे मुख्यमंत्री होऊन गेले. काँग्रेस पक्षात राष्टÑीय पातळीवर नेतृत्वाचा वाद निर्माण झाल्यानेच शरद पवार यांनी बाहेर पडण्याचा बहाणा शोधला. तो संघर्ष १९९१ पासून आणि पी. व्ही. नरसिंहराव यांच्यापासूनचा आहे, असे संघर्ष काँग्रेसमध्ये अनेकवेळा झालेत आणि पक्षात राष्टÑीय तसेच प्रांतिक पातळीवर फूट पडली आहे.

१९६९ मध्ये राष्टÑीय पातळीवर फूट पडली आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. इंदिरा गांधी यांनी लोकप्रतिनिधी तसेच जनमानसही आपल्या बाजूने वळविले, विरोधकांवर मात करून आपल्याच नेतृत्वाखालील काँग्रेस खरी असल्याचे दाखवून दिले. एवढे सगळे ठावूक असताना शिंदेसाहेबांनी ऐन निवडणुकीची धामधूम सुरू होताच दोन्ही काँग्रेसनी एकत्र यावे, असा चिंतनशील विचार मांडण्याची गरज होती का? मनीशंकर अय्यर यांनी गुजरात विधानसभेच्या निवडणुकादरम्यान काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानच्या संबंधाने वादग्रस्त वक्तव्य करून निवडणूक प्रचाराचा बेरंग केला होता. त्या गदारोळात राष्टÑीय प्रसार माध्यमांनी गुजरातच्या निवडणुकीचा प्रचार भलत्याच पातळीवर नेऊन ठेवला होता.

खरं म्हणजे, २१ आॅक्टोबरनंतर बारामतीला जाऊन गोविंद बागेत निवांत बसून चिंतन करीत हा सल्ला शरद पवार यांना देता आला असता. त्यासाठी पवार कुटुंबीयांची परवानगी घेण्याची गरज नाही. महाराष्ट्रासमोर अनेक गंभीर समस्या उभ्या आहेत. निम्मा महाराष्ट्र पुरात वाहतो आहे आणि निम्मा पाण्याविना करपून जातो आहे. मुख्यमंत्री सांगताहेत की, आम्ही एकही घोटाळा केला नाही की, भ्रष्टाचाराचे गालबोट लागले नाही. मग एकनाथराव खडसे, विनोद तावडे, बावनकुळे, प्रकाश महेता आदींना घरी का बसविले? ही मंडळी पंच्याहत्तर वर्षांची झाली होती का? याचे उत्तर महाराष्ट्राला देण्याची गरज आहे. या सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणत्याही खात्यात लाच न देता कामे झाली, असे किमान एक टक्का मतदारांनी तरी सांगावे.

तलाठ्यापासून ते मंत्रालयापर्यंत सर्व काही स्वच्छ कारभाराचे वारे वाहते आहे, असे छातीठोकपणे सांगावे. बावनकुळे या ऊर्जामंत्र्यांचे दिवे का विझले? हे तरी सांगा. खडसे यांना राजीनामा का द्यावा लागला आणि प्रकाश महेता यांचा राजीनामा का घेतला, हे तरी शिंदेसाहेब विचारा ना? आता कोठे आघाडी झाली असताना एकत्रीकरणाची गडबड कशासाठी? निवडणुकानंतर ती करता येईल का? काँग्रेसनेच अविश्वास दाखवून भ्रष्टाचाराने राष्ट्रवादी बरबटली आहे, असे चित्र उभे केले होते. त्यातून सत्ता गेली, हा इतिहास ताजा असताना ऐन निवडणुकीत खोट्या आरोपांना उजाळा देण्याची संधी कशाला देता? चाललंय काय आणि तुम्ही बोलताय काय? असे नाईलाजास्तव विचारावे असे वाटते. कारण तुम्ही ज्येष्ठ आहात.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019