शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: 'एका कुटुंबाचा 'स्वाभिमान' काल कणकवलीत गळून पडला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 18:11 IST

नारायण राणेंनी काल त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन केला

सिंधुदुर्ग: एका कुटुंबाचा स्वाभिमान काल कणकवलीत गळून पडला, अशी खोचक टीका शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंनी यांनी खासदार नारायण राणेंवर केली. बाळासाहेबांना, काँग्रेसला आणि स्वत:च्या कार्यकर्त्यांना फसवणारे भाजपाला काय देणार, अशा शब्दांत देसाईंनी अप्रत्यक्षपणे राणेंना लक्ष्य केलं. त्यामुळे राणे विरुद्ध शिवसेना हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. काल नारायण राणेंनी त्यांच्या दोन्ही मुलांसोबत भाजपात प्रवेश केला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करत असल्याची घोषणा त्यावेळी राणेंनी केली. त्यावर भाष्य करताना एका कुटुंबाचा 'स्वाभिमान' काल कणकवलीत गळून पडला, असं भाष्य शिवसेना नेते सुभाष देसाईंनी केलं. यावेळी त्यांनी दीपक केसरकर यांच्या विधानाचा संदर्भ दिला. नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंविरोधात केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागितल्यास शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद निश्चितपणे संपेल, असं केसरकर काल म्हणाले होते. त्यावर माफी मागायची असेल तर निवडणुकीतून माघार घ्या आणि शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांना पाठिंबा द्या, असं देसाई म्हणाले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही नारायण राणेंचा समाचार घेतला. 'मातीच्या ढिगाऱ्यावरील ही ऐतिहासिक सभा आहे. येत्या २४ तारखेनंतर या ठिकाणी कोणाला तरी गाडायचं आहे. शिवसेना औषधाला राहणार नाही असं म्हणणारे आज सेनेशी जुळवून घ्यायला बघतात, हा काळाचा महिमा आहे. येवल्यापासून कणकवलीपर्यंत शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांची आज अवस्था पहा,' अशा शब्दांत राऊत यांनी राणे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनादेखील लक्ष्य केलं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kankavli-acकणकवलीNarayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेSubhash Desaiसुभाष देसाई