शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

बलाढ्य सत्ताधाऱ्यांशी एकाकी झुंजणारा लढवय्या स्ट्राँगमॅन!

By बाळकृष्ण परब | Published: October 19, 2019 7:03 PM

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान शुक्रवारी रात्री शरद पवार यांचे एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर झाले आणि सगळीकडेच त्या छायाचित्राची चर्चा सुरू झाली.

- बाळकृष्ण परब विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान शुक्रवारी रात्री एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर झाले आणि सगळीकडेच त्या छायाचित्राची चर्चा सुरू झाली. हे छायचित्र होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच नव्हेत तर विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजकारणी, पत्रकार आणि ज्यांचा राजकारणाशी केवळ मतदानापुरता संबंध येतो असे लाखो सर्वसामान्य आणि एरवी शरद पवारांची निंदानालस्ती करणारे या सर्वांकडून हे छायाचित्र उत्स्फूर्तपणे शेअर होत होते. इतकी काय जादू होती या छायाचित्रात? तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढवय्या वृत्ती दाखवून परिस्थितीचा सामना कसा करावा, हे हे छायाचित्र सांगत होते.  सगेसोयरे, साथीदार सोडून गेले असताना, निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या विजयापेक्षा पराभवाचेच भाकित केले जात असताना एक ऐंशी वर्षांची चिरतरुण व्यक्ती शरीरातील असंख्य दुखणी सहन करून विरोधकांना आव्हान देतोय. न थकता पायाला भिंगरी लावल्यासारखा अख्खा महाराष्ट्र पिंजून काढतोय. भर पावसात प्रकृतीची तमा न बाळगता सभा घेतोय, ही बाब सर्वसामान्यांना भावली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पराभवाची चाहूल लागल्यावर शस्रे म्यान करून पांढरे निशाण फडकवणारे अनेक जण दिसून आले. पण सर्व परिस्थिती प्रतिकूल असताना शरद पवार यांनी जो झुंजार बाणा दाखवला त्याला तोड नाही. 

कालच्या सभेतच नव्हे तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी मोदी-फडणवीसांसमोर हतबल झालेल्या विरोधी पक्षाच्या नेतृत्वाची धुरा एकट्याने वाहिली.  लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील बिथरलेल्या नेत्यांची पळापळ होऊन ते भाजपा आणि शिवसेनेच्या आश्रयाला जाऊ लागले होते.  या काळात पद्मसिंह पाटील, भास्कर जाधव गणेश नाईक, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक अनेक नेत्यांनी घड्याळाची साथ सोडली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुक राष्ट्रवादीसाठी काही सोपी नाही, अशीही चर्चा झाली. त्यातच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने नोटीस पाठवल्याने शरद पवारांच्या अडचणी वाढणार अशीच शक्यता वर्तवली जात होती. पण शरद पवार यांनी थेट ईडीच्या कार्यालयात स्वत:हून उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आणि तिथूनच वातावरणात रंगत आली. एकहाती विजय मिळवू म्हणणाऱ्या भाजपा आणि शिवसेना महायुतीसमोर तगडा प्रतिस्पर्धी उभा राहिला. एकीकडे राष्ट्रवादीचा आघाडीतील साथीदार असलेल्या काँग्रेसने निवडणुकीआधीच शस्त्रे टाकल्यासारखे चित्र दिसत होते. तर एकेकाळी एकहाती सत्ता मागणारे राज ठाकरेही विरोधी पक्षात बसण्याची संधी द्या, असे आवाहन करू लागले होते. शरद पवार यांनी मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकारवर हल्ले सुरू केले. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पवार यांच्यात राजकीय कुस्तीवरून रंगलेली जुगलबंदी तर यंदाच्या प्रचाराचे खास आकर्षण ठरले. 
एकंदरीत सत्ताधाऱ्यांविरोधात केलेल्या धडाकेबाज प्रचारामुळे प्रचाराच्या अखेरीस यांदाची विधानसभा निवडणूक शरद पवार विरुद्ध महायुतीचे बडे नेते अशीच झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. आता सत्ताधाऱ्यांविरोधात शरद पवारांनी उघडलेल्या आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला कितपत फायदा होतो, हे येत्या काळात दिसून येईलच. मात्र तूर्तास तरी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मराठा स्ट्राँगमॅन म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांनी जी लढवय्या वृत्ती दाखवली तिची आठवण प्रत्येक निवडणुकीवेळी येत राहील. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण