शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसनं 'ते' आरोप सिद्ध करावेत, अन्यथा...; भाजपाचं खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 14:41 IST

काँग्रेसचे सर्व आरोप भाजपानं फेटाळले

मुंबई: आमदारांच्या फोडाफोडीचे आरोप पुराव्यानिशी सिद्ध करा, अन्यथा माफी माफा, असं थेट आव्हान भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. भाजपानं कोणत्याही आमदाराशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे काँग्रेसनं त्यांचे आमदार सिद्ध करावेत. अन्यथा महाराष्ट्राची आणि स्वत: आमदारांची माफी मागावी, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या सर्व आरोपांचा त्यांनी इन्कार केला. राज्यातील सत्ता स्थापनेचा लवकरच सुटेल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मात्र त्यासाठी आमदारांची फोडाफोड करणार नाही, असंदेखील ते म्हणाले. 'भाजपा नेहमी विचारांची लढाई लढते. आम्हाला आमदार फोडण्याची गरज वाटत नाही. असं राजकारण भाजपानं कधीही केलेलं नाही. काँग्रेस नेत्यांनी फोडाफोडीचे आरोप करून त्यांच्याच आमदारांवर अविश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी आरोपाचे पुरावे द्यावेत. अन्यथा काँग्रेसनं स्वत:च्या आमदारांची आणि महाराष्ट्राची माफी मागावी', असं थेट आव्हान त्यांनी दिलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील फोडाफोडीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही. पंधरा वर्षे शिवसेना विरोधी पक्षात होती. मात्र तरीही त्यांचा एकही आमदार फुटला नाही, असं मुनगंटीवार म्हणाले. शिवसेनेनं दुसऱ्या कारणानं आपले आमदार एकत्र ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन आठवडे उलटूनही सरकार स्थापन करू न शकलेल्या भाजपानं आता फोडाफोडीचं राजकारण सुरू केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 'भाजपाकडून काँग्रेसच्या आमदारांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इगतपुरीच्या आमदारांना काही जणांनी फोन केला होता. मात्र कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीआधी आमदार फोडणाऱ्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत जनतेनं धडा शिकवला आहे. त्यामुळे आता कोणी फुटून बाहेर निघण्याचा प्रयत्न केल्यास सर्व विरोधी पक्ष मिळून एकच उमेदवार देऊन त्याला राजकारणातून संपवू. जनतेशी केली जाणारी प्रतारणा खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा