शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा एक गट देणार शिवसेनेला 'हात'?; भाजपाला दूर ठेवण्याच्या हालचाली जोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 12:31 PM

राज्यात नव्या राजकीय समीकरणांचे संकेत

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 12 दिवस उलटले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. शिवसेना, भाजपामध्ये सुरू असलेला संघर्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीची वाढलेली जवळीक अशा घडामोडी राज्यात घडत आहेत. राष्ट्रवादी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेस द्विधा मनस्थितीत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी शिवसेनेला सहकार्य करण्याबद्दल फारशा अनुकूल नाहीत. मात्र काँग्रेसचा एक गट शिवसेनेसोबत जाण्यास उत्सुक आहे.भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडून सरकार स्थापनेसाठी प्रस्ताव आलाच तर तो मान्य करावा, असं मत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलं आहे. यासोबतच विश्वजीत कदम, अमित देशमुख यांचीदेखील हीच भूमिका असल्याचा दावा पाटील यांनी केला. काँग्रेसमधील तरुण गट शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी अतिशय आग्रही आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना मात्र शिवसेनेला सहकार्य करण्याचा विचार फारसा पटत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेनं सरकार स्थापन करावं आणि काँग्रेसनं त्यास बाहेरुन पाठिंबा द्यावा, या प्रस्तावाबद्दल काँग्रेसचे दिल्लीतील नेते अनुकूल नाहीत. त्याचा राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपला होईल, काँग्रेसला मात्र बळ मिळणार नाही, असं दिल्लीतील नेत्यांचं मत असल्याचं समजतं. उत्तर प्रदेशात याआधी काँग्रेसनं समाजवादी पक्ष आणि मायावतीच्या बसपा या दोन पक्षांना बाहेरुन पाठिंबा दिला होता. त्यावेळी काँग्रेसचा जनाधार कमी झाला आणि हे दोन पक्ष वाढले. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी-शिवसेनेचं सरकार आल्यास अनेक काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीकडे वळतील व काँग्रेस दुबळी होईल. शिवाय, हे सरकार किती काळ टिकेल याचीही खात्री नाही. त्यामुळे काँग्रेसनं सावध भूमिका घ्यावी, असं ज्येष्ठांना वाटतं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस