शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Maharashtra Election 2019 : तेव्हा मुस्लिम मते मिळाली नव्हती! प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 13:08 IST

विरोधी पक्षनेता नव्हे, तर वंचित आघाडीच सत्तेवर येईल..

ठळक मुद्दे कोण कुणाची ‘बी टीम’ हे जनता जाणते

धनाजी कांबळे - पुणे : वंचित बहुजन आघाडीबाबत आता सगळेच राजकीय पक्ष बोलायला लागले आहेत. याचा अर्थ असा होतो, की प्रस्थापितांच्या गडांना धक्का देण्याची ताकद वंचितमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मते मिळाली नाहीत. ती यावेळी मिळतील. त्यामुळे विरोधी पक्षनेता नव्हे, तर वंचित आघाडीच सत्तेवर येईल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.वंचित बहुजन आघाडीसोबत आता एमआयएम नाही, त्याचा काय परिणाम होईल?- लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जनतेने अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. तब्बल ४१ लाख मते जनतेने दिली आहेत. यात एमआयएमचाही काही प्रमाणात वाटा आहे. मात्र, जितके मुस्लिम समाजाचे मतदान आहे, तेवढे सगळे आम्हाला मिळालेले नाही. आता मौलवींनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे मुस्लिम समाजाचीही मते मिळतील.वंचित आघाडीला भाजपची बी टीम म्हटले जाते, त्याचे काय?- आज कोण कोणत्या पक्षातून कुठे गेलेत, हे सर्वश्रुत आहे. जे त्यांच्या पक्षांचे मूळचे निष्ठावान होते, त्यांना डावलून जे आयाराम आहेत त्यांना तिकिटे दिली आहेत. त्यामुळे कोण कुणाची ‘बी टीम’ की ‘ए टीम’ आहे, हे महाराष्ट्रातील सुज्ञ जनता जाणते. वंचितने सर्व समूहांना उमेदवारी दिली आहे, हे सोशल इंजिनिअरिंग कितपत यशस्वी होईल?- प्रस्थापितांना धडकी भरावी एवढी ताकद निश्चितपणे वंचितमध्ये आलेली आहे. आम्ही केवळ घोषणाबाजी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो नाही. तर आम्ही एक ठोस असे व्हिजन घेऊन दृष्टिकोन घेऊन मैदानात उतरलो आहोत. जनतेच्या कल्याणाचा मार्ग काय असू शकतो, हे आमच्याच पक्षाने दाखवून दिले आहे. तसा जाहीरनामा आम्ही मांडला आहे. आरएसएसच्या विचारसरणीनुसार चाललेल्या सरकारला ही परिस्थिती अशीच राहावी, असं वाटतं. बलुतेदार, आलुतेदार अशा सर्वच दुर्लक्षित घटकांना आम्ही उमेदवारी दिली आहे.कोल्हापूर, सांगलीत आलेल्या महापुरावेळी आपण एक गाव दत्तक घेतले. तिथे काय काम सुरू आहे?- कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसला, या वेळी मी विदर्भात दौºयावर होतो. मला या भागातील परिस्थितीबद्दल समजल्यावर पूरग्रस्तांना तत्काळ मदत पोचविण्याचे आवाहन आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही केले होते. ब्रह्मनाळ गावातच बोट उलटली होती. तेथील हानी मोठ्या प्रमाणात असल्याने आम्ही हे गाव दत्तक घेतले. आणि आजही तेथे काम सुरूच आहे. ज्यांना केवळ राजकारणच करायचे आहे, त्यांनी ‘सेल्फी विथ फ्लड’ असा दौरा करून बातम्या छापून आणल्या. प्रत्यक्षात सरकार आणि प्रशासन यात पूर्णत: अपयशी ठरले आहे.मुख्यमंत्री म्हणतात, वंचितचा विरोधीपक्ष नेता असेल, खरे काय?- कुणी काय बोलावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न. परंतु, आमची ताकद वाढली आहे, हे यावरून दिसते. त्यामुळे  आमची भीती वाटत असल्यानेच ते असे बोलत असावेत. वंचितचा विरोधी पक्षनेता नव्हे, तर आमचा पक्ष किंग ठरेल. सरकार स्थापन करण्याचा आमचा दावा आहे.कोणते मुद्दे घेऊन तुमचा पक्ष मतदारांपुढे जात आहे?- अच्छे दिनचे स्वप्न दाखवून ते सत्तेवर आले. पण आज हजारो कंपन्या बंद पडल्या आहेत. नोटाबंदी, जीएसटीमुळे छोट्या व्यापाºयांनी आपले व्यवसाय बंद केले आहेत. अ‍ॅटो सेक्टर, रिअल इस्टेटमध्ये मंदी आली आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत, हे मुद्दे आहेत. आमच्याकडे रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम आहे.  आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. पोलिसांची ड्युटी आजही निश्चित वेळेची नाही. ती केवळ कागदावरच आहे. त्यांच्यासाठी ८ तासांची ड्युटी करायची आहे. शेतीपूरक उद्योगांना चालना दिली जाईल. सहकारी बँकांची पुनर्रचना, अल्पभूधारक शेतकºयांना मोफत बी-बियाणे वाटप आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे आमचे धोरण आहे. खरं तर बाबासाहेबांनी जे विकासाचं स्वप्न पाहिलं होतं, ते सत्यात आणण्यासाठी आम्ही सत्ता मागत आहोत..........राज्यात ४३ लाख बोगस मतदार राज्यात ४३ लाख बोगस मतदार असल्याचे समोर आले आहे. सत्ताधारी पक्ष निवडून येण्यासाठी ईव्हीएमबरोबरच बोगस मतदारांवर लक्ष ठेवून आहे. प्रत्येक मतदाराला एक इपिक नंबर असतो, तो नंबर दुसºया कोणत्याही मतदाराला नसतो, असे असतानाही राज्यात बोगस मतदार तयार करण्यात आले आहेत. त्याची नोंदणीही झाली आहे. प्रशासकीय अधिकारीदेखील यात सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, यामुळे निश्चितपणे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMuslimमुस्लीम