शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

माळावर अचानक दिसू लागलं हेलिकॉप्टर अन् त्यातून खाली उतरले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 7:09 PM

चालकाला पुढचे दिसेनासे झाल्यामुळे हॅलिकॉप्टरचं लँडिंग

- रवींद्र येसादेउत्तूर : दुपारचे पावणेतीन वाजले होते, पावसाची रिमझिम सुरू होती. वारे जोराने वाहत होते. रोजच्या पावसानं त्रस्त झालेला बळीराजा कामात व्यस्त असताना आकाशात हॅलिकॉप्टर घिरट्या मारू लागले अन् अचानक गडहिंग्लजमधील बेकनाळ येथील तळी माळावर उतरले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. त्यांना बेकनाळकरांनी नेसरी. ता. गडहिंग्लज येथे मार्गस्थ केले.चंदगडचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या सभेसाठी हॅलिकॉप्टरने प्रदेशाध्यक्ष पाटील नेसरीकडे चालले होते. पावणेतीनच्या सुमारास गडहिंग्लज परिसरात पावसाने सुरुवात केली. हॅलिकॉप्टरला पुढचे दिसेनासे झाल्यामुळे ते गडहिंग्लज शहरातून माघारी बेकनाळच्या दिशेने घिरट्या घालू लागले. बेकनाळच्या तळी माळावर हॅलिकॉप्टर चालकाला हॅलिपॅड दिसले. चालकाने तातडीने हॅलीपॅडवर लँडिंग केले. यानंतर पाटील हॅलिकॉप्टरमधून खाली उतरले. पुढील काही क्षणातच हॅलिकॉप्टर कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.

हॅलिकॉप्टरमधून कोण उतरले हे पाहण्यासाठी शेतातील बळीराजा हॅलिपॅडच्या दिशेने गेले तर प्रदेशाध्यक्ष पाटील दिसले. पाटील यांनी उपस्थितांना नेसरी येथे प्रचारासाठी जाणार असल्याचे सांगितले. आपल्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याचे पाहून संभाजी धुमाळ, मधुकर जगताप, ओमकार सुर्यवंशी, विकास धुमाळ, सुधाकर सुतार आदी कार्यकर्त्त भारावून गेले . प्रदेशाध्यक्ष पाटील यांना बेकनाळमध्ये मोटरसायकलने आणून नेसरीच्या दिशेने चारचाकी वाहनातून मार्गस्थ करण्यात आले. मोटरसायकल वरून जाताना हवा कुणाची आहे असे विचारले असता हवा आमदार मुश्रीफ यांचीच असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस