शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: कुस्ती बरोबरीच्या पैलवानाशी होते, लहान मुलांशी नाही; पवारांचा फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 19:47 IST

शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

नाशिक: कुस्ती बरोबरीच्या पैलवानाशी होते, लहान मुलांशी नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. राज्यातील शेती आणि उद्योग संकटात सापडला आहे. मात्र यातून राज्याला बाहेर काढण्याची धमकी सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. प्रश्न सोडवण्याची जबाबदारी असलेल्या सरकारकडून केवळ सत्तेचा दुरुपयोग सुरू असल्याची टीका पवारांनी केली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन राज्यासह केंद्र सरकारलादेखील लक्ष्य केलं. वर्ल्ड हंगर इंडेक्समध्ये भारताची कामगिरी पाकिस्तानपेक्षाही सुमार असल्याचं वृत्त काल समोर आलं. त्याचा संदर्भ देत भाजपाच्या काळात जागतिक पातळीवर देशाची एवढी बेईज्जती झाल्याचं पवार म्हणाले. 'मुलांना अन्नाचा पुरवठा करण्याच्या बाबतीत भारताची कामगिरी अतिशय वाईट आहे. आपल्यापेक्षा नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये मुलांना अधिक अन्न मिळतं. आपल्या देशासाठी ही बातमी चांगली आहे का?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जो देश जगात अन्नधान्याची निर्यात करतो, त्या देशातल्या मुलांना खायला अन्न मिळत नाही, अशी बातमी जागतिक स्तरावर प्रसिद्ध होते. इतकी बेईज्जती भाजपाच्या काळात झाली, अशा शब्दांमध्ये पवारांनी मोदी सरकारचा समाचार घेतला. केंद्रासह राज्य सरकारचादेखील पवारांनी समाचार घेतला. राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. कारखाने आजारी आहेत. मंदीचं संकट आहे. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. इतकी संकटं राज्यासमोर आहेत. मात्र त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असणारी धमक सरकारमध्ये नाही. प्रश्न सोडण्याऐवजी विरोधकांना संपवण्यासाठी सत्तेचा गैरवापर सुरू आहे, अशा शब्दांत पवार राज्य सरकारवर बरसले.   

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार