शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

Maharashtra Election 2019: तब्बल १ हजारहून अधिक उमेदवार करोडपती; जाणून घ्या कोणत्या पक्षाचे किती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 13:18 IST

Maharashtra Vidhan Sabha Election: तब्बल ४५३ उमेदवारांची संपत्ती ५ कोटीपेक्षा जास्त

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस आहे. आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील. सोमवारी संपूर्ण राज्य आपला आमदार, नवं सरकार निवडण्यासाठी मतदान करेल. प्रचारादरम्यान, मतदानावेळी उमेदवारांच्या कार्यक्षमतेइतकीच त्यांच्या संपत्तीचीदेखील चर्चा होते. उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या मालमत्तेचा तपशील पाहिल्यास तब्बल ३२ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत.विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या १००७ उमेदवारांची संपत्ती १ कोटीपेक्षा अधिक आहे. ५ कोटी किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या उमेदवारांची संख्या ४५३ इतकी आहे. म्हणजेच यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या १५ टक्के उमेदवारांची संपत्ती ५ कोटीहून अधिक आहे. आमदार होण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या १० टक्के म्हणजेच ३०४ उमेदवारांची संपत्ती २ ते ५ कोटींच्या दरम्यान आहे. तर ५० लाख ते २ कोटी संपत्ती असलेल्या उमेदवारांची संख्या ५४० इतकी आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा आकडा १० ते ५० लाखांदरम्यान असल्याचं सांगणाऱ्या उमेदवारांचं प्रमाण ६८० इतकं आहे. म्हणजेच एकूण उमेदवारांपैकी २२ टक्के उमेदवारांची संपत्ती १० ते ५० लाखांदरम्यान आहे. तर १० लाखांहून कमी मालमत्ता असलेल्या उमेदवारांची संख्या ११३५ इतकी आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ३६ टक्के उमेदवारांची संपत्ती १० लाखांपेक्षा कमी आहे. सर्वाधिक कोट्यधीश उमेदवार सत्ताधारी भाजपाचे आहेत. भाजपा यंदा १६४ जागा लढवत आहेत. त्यापैकी १५५ म्हणजेच ९६ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. त्याखालोखाल शिवसेनेचे ९४ टक्के म्हणजेच ११६ उमेदवार कोट्यधीश आहेत. शिवसेना यंदा १२४ जागा लढवत आहेत. महाआघाडीतील काँग्रेस १४७ जागांवर लढत आहे. त्यांचे १२६ उमेदवार कोट्यधीश आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला १२४ जागा आल्या होत्या. मात्र त्यांनी तीन जागांवरील उमेदवार मागे घेतले. राष्ट्रवादीचे १०१ उमेदवार कोट्यधीश आहेत.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस