शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

Maharashtra Election 2019: कलम 370 वर राज ठाकरेंचं अवघ्या दोन शब्दांत भाष्य; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 9:42 PM

पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहांवर निशाणा

मुंबई: काश्मीरमधून काढून टाकण्यात आलेल्या कलम 370 चा मुद्दा राज्याच्या निवडणूक प्रचारात वारंवार उपस्थित करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहांनाराज ठाकरेंनी दोन शब्दात उत्तर दिलं आहे. 'काश्मीरमधून कलम 370 हटवलंत. 'अभिनंदन, पुढे?'', अशा अवघ्या दोन शब्दांमध्ये राज यांनी या विषयावर भाष्य केलं. तुम्ही कामावर नव्हे, तर भावनेवर मतदान करता. याचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारे राज्याशी संबंधित नसलेले मुद्दे राज्याच्या निवडणुकीत काढले जातात, असं राज ठाकरे उपस्थितांना म्हणाले. ते मालाडमधील प्रचारसभेत बोलत होते. तुम्ही थंड राहता. तुम्ही पेटून उठत नाही. त्यामुळेच तुम्हाला सत्ताधारी गृहीत धरतात, असं राज ठाकरे म्हणाले. पुन्हा सत्ता द्या, वेगळा विदर्भ करू, अशी भाषा भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार करतात. महाराष्ट्र म्हणजे काय तुमच्या वाढदिवसाचा केक वाटला का?, असा प्रश्न राज यांनी विचारला. शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला. तर त्यांच्या आई जिजामातांचा जन्म सिंदखेडराजामध्ये झाला. महाराष्ट्राचे तुकडे करुन तुम्ही आई आणि मुलाची ताटातूट करणार का, असादेखील सवाल राज यांनी उपस्थित केला.राज ठाकरेंनी बुलेट ट्रेनवरुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं. दूरवर असणारी ठिकाणं जोडण्यासाठी बुलेट ट्रेनचा वापर करण्यात येतो. मग मुंबई, अहमदाबाद या दोन जवळच्या शहरांना जोडण्यासाठी बुलेट ट्रेन सुरू करण्याचं कारण काय, असा प्रश्न राज यांनी विचारला. मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्याचा राग अद्याप काहींच्या मनात आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप राज यांनी केला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेArticle 370कलम 370Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी