शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Exclusive: 'या' दोन जागांवर शिवसेनेचा पराभव होणार; मुख्यमंत्र्यांनी केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 11:09 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - राज्यात विरोधी पक्ष असेल की नाही हे मतदारच ठरवतील पण आमची संख्या अभूतपूर्व वाढलेली असेल

यदू जोशी 

मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुतीमध्ये लढत आहे. मात्र अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांच्या बंडखोरांनी युतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंड पुकारलं आहे. अशातच कणकवली आणि साताऱ्यातील माण मतदारसंघात भाजपा उमेदवाराविरोधात शिवसेनेने त्यांचे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या दोन मतदारसंघात शिवसेना-भाजपा आमनेसामने असल्याचं चित्र आहे. 

राज्यातील बंडखोरीचा भाजपा-शिवसेनेला कितपत फटका बसेल या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. बंडखोर अनेक ठिकाणी आहेत पण लोक चिन्ह पाहून महायुतीलाच मतदान करतील हा माझा विश्वास आहे. बंडखोरांचा मोठा त्रास होणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. त्याचसोबत चॅनेल्सवर जो दाखवताहेत तसा कुठलाही सर्व्हे झालेला नाही. जो झालाय त्याची माहिती मी नंतर देईन पण तो ‘एन्करेजिंग’ आहे. माण आणि कणकवलीत भाजप-शिवसेना आमनेसामने आहेत. या दोन्ही जागा भाजपच जिंकेल असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. 

तसेच दोन तृतीयांशपेक्षा (१९२) आम्ही किती पुढे जाऊ तेवढंच आता पहायचंय असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात विरोधी पक्ष असेल की नाही हे मतदारच ठरवतील पण आमची संख्या अभूतपूर्व वाढलेली असेल आणि विरोधकांची संख्या अभूतपूर्व कमी झालेली असेल. महायुतीला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद असून आम्ही पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज आहोत.राज ठाकरे यांनी मतदारांना विरोधी पक्षासाठी साकडे घातले असले तरी जनता त्यांना ते देईल, असे आपल्याला वाटत नाही.

या निवडणुकीनंतर शरद पवार राजकीयदृष्ट्या संपतील?असं कोणी संपत नसतं पण, सत्तेचा उपयोग करून सत्ता आणायची , सत्तेसाठी काहीही करायचं हा गेल्या काही वर्षांत पवारांनी आणलेला भ्रष्ट संस्कृतीचा पॅटर्न संपेल. तो लोकांना पसंत पडेल असं वाटत नाही.

बावनकुळे, खडसे असोत की तावडे यांची तिकीटं कापताना त्यांची मानहानी झाल्याचे चित्र टाळता आले नसते का?तो निर्णय माझा नव्हता. पक्षाच्या संसदीय मंडळाने तो घेतला आणि मी त्याचा सदस्य नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी त्यांची एकेकट्याची नावे संसदीय मंडळाकडे पाठविली होती पण संसदीय मंडळाने वेगळा विचार केला.

दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

बारामतीची 'ती' खेळी राज ठाकरेंना आता कळली असेल; मुख्यमंत्र्यांचा टोला

 ''राज्य बँकेच्या घोटाळ्यात शरद पवार यांचा संबंध''

नारायण राणे-उद्धव ठाकरे 'युती'साठी मुख्यमंत्री करणार मध्यस्थी, कारण...

फेसबुकवरील आक्षेपार्ह पेजेसविरोधात मनसेची तक्रार; 'त्यांना' वेळीच आवरा अन्यथा...

शिवसेनेचं पुन्हा गुजराती प्रेम; एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीवर मराठी भाषिक संतप्त

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkankavli-acकणकवलीman-acमाण