Maharashtra Election 2019: फेसबुकवरील आक्षेपार्ह पेजेसविरोधात मनसेची तक्रार; 'त्यांना' वेळीच आवरा अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 09:02 AM2019-10-19T09:02:24+5:302019-10-19T09:08:56+5:30

भविष्यात या पेजेसवरुन अशा घटना सुरु राहिल्या तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते असा इशारा मनसेने दिला आहे. त्याचसोबत मनसेने याबाबत पुरावे दिले आहेत. 

Maharashtra Election 2019: MNS complaint against 'those' offensive pages on Facebook; 'Them' at the same time otherwise ... | Maharashtra Election 2019: फेसबुकवरील आक्षेपार्ह पेजेसविरोधात मनसेची तक्रार; 'त्यांना' वेळीच आवरा अन्यथा...

Maharashtra Election 2019: फेसबुकवरील आक्षेपार्ह पेजेसविरोधात मनसेची तक्रार; 'त्यांना' वेळीच आवरा अन्यथा...

Next

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. सध्या राजकारणात राजकीय पक्षांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत फेसबुकवर तयार करण्यात आलेल्या पेजेसच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला जात असल्याचं पाहायला मिळालं आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवर Aghadi Bighadi, Aham Bhrashtrami, भ्रष्टवादी पार्टी, पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९ आणि हाताची घडी तोंडावर बोट या फेसबुकपेजवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट आणि मजकूर टाकल्या जात आहेत. या पोस्टमुळे समाज विघातक अपशब्द वापरुन विरोधी पक्षातील नेत्यांवर विशेषत: राज ठाकरेंवर लिखाण करुन लोकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. 
तसेच या फेसबुकच्या माध्यमातून आर्थिक गणिते सुरु असून Aghadi Bighadi या पेजेसने गेल्या ६-८ महिन्यांच्या कालावधीकरिता ८ लाख ६२ हजार फेसबुकला दिले आहेत. तसेच Aham Bhrashtashmi, भ्रष्टवादी पार्टी, पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९, हाताची घडी तोंडावर बोट हे पेजसुद्धा फेसबुकला लाखो रुपये मोजत आहेत. भविष्यात या पेजेसवरुन अशा घटना सुरु राहिल्या तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते असा इशारा मनसेने दिला आहे. त्याचसोबत मनसेने याबाबत पुरावे दिले आहेत. 

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर आणि मनसेची बदनामी करण्याचा प्रयत्न नेहमी होत असून त्या व्यक्तींवर ताबडतोब गुन्हा दाखल करुन योग्य ती कारवाई करावी. जर फेसबुक कंपनी या गोष्टीला दाद देत नसेल तर त्यांना आमच्या पद्धतीने समज देऊच अशा शब्दात मनसेने कडक भूमिका घेतली आहे. मनसेने याबाबत पोलीस आयुक्त, फेसबुक कार्यकारी अधिकारी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांकडे याबाबत पत्र दिलं आहे. त्यामुळे आगामी काळात अशा सोशल मीडियाच्या पेजेसवरुन रस्त्यावर संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.  

Web Title: Maharashtra Election 2019: MNS complaint against 'those' offensive pages on Facebook; 'Them' at the same time otherwise ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.