शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

महाराष्ट्र निवडणूक 2019: सरकार स्थापनेतील विलंबामुळे सर्व पक्ष बनले टीकेचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 06:28 IST

गडकरी, राऊत यांची विधाने मात्र संवादाची दारे किलकिली करणारी

मुंबई : राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले विधान वा शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे केलेले वक्तव्य यावरून नवेनवे तर्कवितर्क आणि शक्याशक्यतेच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.नितीन गडकरी यांचे विधान दोन पक्षांतील संबंधांबाबत बोलकेच आहे. पण युती होऊ नये म्हणून भाजपमधील काहींनी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील बंद खोलीत झालेल्या निर्णयाचे सत्य मोदींपासून लपवून ठेवले जात आहे, असे संजय राऊत यांचे वक्तव्यही मोदींशी संवादाचे दार किलकिले करणारे असल्याचाही अर्थ जात आहे.शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी सरकार स्थापनेचे जवळपास नक्की केले असूनही अद्याप निर्णय मात्र झालेला नाही. हे तिघेही वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकमेकांविरुद्ध लढूनही भाजपच्या सत्तेबाहेर ठेवण्यासाठी एकत्र येत आहेत. या पार्श्वभूमीवर वरील दोन्ही विधाने बरेच काही सांगून जातात. राजकीय स्वार्थासाठी देशात अनेक ठिकाणी अशा युती व आघाड्या पूर्वीही झाल्या आहेत आणि यापुढेही होत राहतील. त्यामुळे या पक्षांचे व त्यांच्या नेत्यांचे भले होते. पण जनतेच्या हिताचा मात्र विचार होताना दिसत नाही. एकदा नैतिकता दूर सारली की मग काहीही करणे शक्य होते याचा अनुभव याआधी अनेकदा आला आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी व राऊत यांच्या वक्तव्यांकडे पाहिले तर अनेक अर्थ निघू शकतात.राज्य भीषण आर्थिक संकटात आहे. शेतकरी ओल्या दुष्काळाने मोडून गेला आहे. घरे, जनावरे वाहून गेली आहेत. सर्व नेते आपणच जनतेचे खरे सेवक असल्याचा आव आणत असताना सरकार स्थापनेत सर्व पक्षांना होणारा विलंब जनतेच्या संतापात तेल ओतणारा आहे.जाहीर विधाने आणि...मुख्यमंत्रिपद आम्हाला मिळेल, असे आश्वासन अमित शहा यांनी ठाकरे यांना दिले होते. ते पाळले जात नाही, अशी शिवसेनेची टीका आहे, तर असे आश्वासन दिलेच नव्हते, असे अमित शहा यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यातूनच युतीमध्ये दरी आणखी वाढली आहे. त्यातूनच महायुती म्हणून या पक्षांनी एकत्रित येऊ न सरकार स्थापन केले नाही. राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेबाबत असमर्थता दर्शवविणारा भाजप बाहेर मात्र राज्यात आमचेच सरकार येणार, असे खात्रीने सांगत आहे. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी मिळून पुरेसे बहुमत होत असतानाही ते सरकार स्थापन करण्यास विलंब करत आहेत. त्यामुळे हे सगळे पक्ष जनतेच्या टीकेचे लक्ष्य होत आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतNitin Gadkariनितीन गडकरीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा