शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडीचा मसुदा तयार; सोनियांच्या भेटीसाठी शरद पवार दिल्लीला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 19:52 IST

लवकरच राज्यात निर्माण झालेली कोंडी फुटण्याची शक्यता

मुंबई: राज्यात महाशिवआघाडी आकारास येण्याची शक्यता आहे. यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आज पहिली समन्वय बैठक झाली. या बैठकीत तिन्ही पक्षांनी एक मसुदा तयार केला. हा मसुदा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पाठवण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय कोंडी लवकरच फुटण्याची शक्यता आहे. राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आज पहिली समन्वय बैठक झाली. महाशिवआघाडीच्या सरकारचा किमान समान कार्यक्रम निश्चित करण्याच्या दृष्टीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला. लवकरच हा मसुदा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता कोंडी लवकरच फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज सायंकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झालेल्या समन्वय बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, छगन भुजबळ तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई बैठकीला हजर होते.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुढील दोन दिवसांत सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत. या भेटीत महाशिवआघाडीबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व आमदारांना १७ नोव्हेंबरला मुंबईत बोलावलं आहे. १७ नोव्हेंबरला शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात महाशिवआघाडीची घोषणा होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे नगरसेवक गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतील रिट्रीट हॉटेलमध्ये होते. कालच त्यांना आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश देण्यात आले. काल सायंकाळपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका सुरू होत्या. यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सत्ता स्थापनेची घाई नसल्याचं म्हटले होते. कालच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीच्या बैठकीला दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, नवाब मलिक, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण व विजय वडेट्टीवार यांचा समावेश होता.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस