शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून राज्यपालांची भेट घेतली; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 2:52 PM

शिवसेना, भाजपामध्ये सत्तावाटपावरून सुरू असलेलं दबावाचं राजकारण कायम

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटत आले तरी अद्याप महायुतीला सत्ता स्थापन करता आलेली नाही. शिवसेना, भाजपाला अद्याप सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करता आलेला नाही. राज्याच्या राजकारणात आज घडत असलेल्या घडामोडी पाहता पुढील काही दिवस सरकार स्थापनेचा तिढा कायम राहण्याची चिन्हं आहेत. मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लवकरच सत्ता स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. पाटील यांच्यासह भाजपा मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला जनादेश दिला आहे. मतदारांनी सरकार स्थापनेसाठी कौल दिला आहे. महायुतीचं सरकार व्हावं ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाची इच्छा असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितलं. या बैठकीत भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला नसल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्ता स्थापनेसाठी जास्त वेळ लागत असल्यानं राज्यपाल महोदयांशी कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती पाटील यांनी दिली. राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली. आता राज्यपालांशी झालेल्या चर्चेच्या आधारे पुढे काय करायचं याचा निर्णय घेतला जाईल, असं पाटील म्हणाले.राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीवेळी अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत भाजपानं दिलेला शब्द पाळावा, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. त्यावेळी सत्तापदांच्या समान वाटपाचा शब्द भाजपाकडून देण्यात आला होता. मात्र आता भाजपानं शब्द फिरवला आहे. भाजपा मला खोटा ठरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्धव यांनी भाजपाच्या कोर्टात चेंडू ढकलल्यानं सत्ता वाटपाचा तिढा कायम राहण्याची चिन्हं आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलAshish Shelarआशीष शेलारGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे