Maharashtra Corona Updates: चिंताजनक आकडेवारी! राज्यात आज ३६ हजार २६५ रुग्णांची नोंद; सक्रिय रुग्णांचा आकडा १ लाख पार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 08:32 PM2022-01-06T20:32:55+5:302022-01-06T20:33:21+5:30

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्ये झपाट्यानं वाढत असून आज दिवसभरात तब्बल ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Maharashtra Corona Updates state reports 36265 new cases 13 deaths and 8907 discharges today | Maharashtra Corona Updates: चिंताजनक आकडेवारी! राज्यात आज ३६ हजार २६५ रुग्णांची नोंद; सक्रिय रुग्णांचा आकडा १ लाख पार

Maharashtra Corona Updates: चिंताजनक आकडेवारी! राज्यात आज ३६ हजार २६५ रुग्णांची नोंद; सक्रिय रुग्णांचा आकडा १ लाख पार

Next

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्ये झपाट्यानं वाढत असून आज दिवसभरात तब्बल ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आजच्या रुग्णवाढीसह राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा आता १ लाख १४ हजार ८४७ इतका झाला आहे. 

राज्यात गेल्या २४ तासांत ३६,२६५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ८,९०७ रुग्णांनी आज कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज ७९ नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यासह ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांचा आकडा ८७६ इतका झाला आहे. तर बरं झालेल्या रुग्णांचा आकडा ३८१ इतका झाला आहे. 

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांच्या पार
राज्यात सर्वाधिक रुग्णवाढ मुंबईत नोंदवली जात आहे. राज्यातील आजच्या ३६ हजारांच्या रुग्णसंख्येत २०,१८१ रुग्ण तर एकट्या मुंबईतून आढळून आले आहेत. मुंबईत सध्या ७९,२६० सक्रिय रुग्ण आहेत. एका दिवसात मुंबईतील रुग्णसंख्येचा आकडा ५ हजारांनी वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईचा आजचा पॉझिटिव्हिटी दर तब्बल २९.९० टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.

मुंबईत बुधवारी तब्बल १५,१६६ नवे कोरोना रुग्ण आढलले होते. आज हाच आकडा थेट २० हजारांच्यावर पोहोचला आहे. मुंबईतील धारावी परिसरातून आज १०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दादरमध्ये २२३ आणि माहित परिसरातून ३०८ रुग्णांची वाढ झाली आहे. 

मुंबई लॉकडाऊन होणार?
मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांच्या घरात गेल्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं विधान महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केलं होतं. त्यास महापौर किशोरी पेडणेकर यांनीही दुजोरा दिला होता. आज मुंबईत २० हजाराहून अधिक रुग्ण आढळल्यानं आता शहरात लॉकडाऊन लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

 

Web Title: Maharashtra Corona Updates state reports 36265 new cases 13 deaths and 8907 discharges today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.