जंगल मे भौकाल! Mirzapur 3 चा टीझर आऊट, रिलीज डेटही समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 12:59 IST2024-06-11T12:58:08+5:302024-06-11T12:59:16+5:30

'मिर्झापूर' वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 2020 साली मिर्झापूरचा दुसरा सीझन रिलीज झाला होता.

Mirzapur 3 Teaser out release date also revealed starring Pankaj Tripathi Ali Fazal Shweta Tripathi | जंगल मे भौकाल! Mirzapur 3 चा टीझर आऊट, रिलीज डेटही समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

जंगल मे भौकाल! Mirzapur 3 चा टीझर आऊट, रिलीज डेटही समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

बहुप्रतिक्षित वेबसीरिज 'मिर्झापूर 3' (Mirzapur 3) चा टीझर अखेर रिलीज झाला आहे. दोन सीझनच्या यशानंतर आता तिसरा सीझन भौकाल गाजवायला येत आहे. यावेळी गुड्डू भैय्या आणि कालीन भैय्या दोघांमध्ये भयानक युद्ध रंगणार आहे. कालीन भैय्या मुन्ना भैय्याच्या हत्येचा बदला कसा घेतात आणि गु़ड्डू भैय्याची मिर्झापूर मधली दहशत बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सीरिजचा टीझर उत्सुकता वाढवणारा आहे. सीरिजची रिलीज डेटही समोर आली आहे. 

'मिर्झापूर' वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 2020 साली मिर्झापूरचा दुसरा सीझन रिलीज झाला होता. त्यानंतर तिसऱ्या सीझनची सर्वांनाच उत्सुकता होती. दुसऱ्या सीझनच्या शेवटी गुड्डू भैय्या आणि गोलू मुन्ना भैय्याची हत्या करतात. यामध्ये कालीन भैय्या वाचतात. आता पुढे काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सीरिजचा टीझर समोर आला आहे. गोळीबार, रक्तपात, राजकारण असं सगळंच सीरिजमध्ये आहे. मिर्झापूरच्या गादीवर नक्की कोण बसणार यावरुन पदडा उठणाक आहे. 5 जुलै रोजी सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

एक्सेल मीडिया एंटरटेन्मेंटद्वारा निर्मित मिर्झापूर 3 ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान यावेळी मिर्झापूरची जान मुन्ना भैय्या म्हणजेच अभिनेता दिव्येंदू शर्मा सीरिजमध्ये दिसणार नाही. यामुळे चाहते निराश आहेत.सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, विजय वर्मा, ईशा तलवार, शीबा चड्डासह अनेक कलाकारांची भूमिका आहे. अॅमेझॉन प्राईमवर सीरिज रिलीज होणार आहे. 

Web Title: Mirzapur 3 Teaser out release date also revealed starring Pankaj Tripathi Ali Fazal Shweta Tripathi