शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Maharashtra CM : सध्यातरी अजित पवारांकडेच मोठी पॉवर; आमदारांना ऐकावेच लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 12:53 IST

एकीकडे शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी भाजपाशीही बोलणी सुरू ठेवली होती.

मुंबई : राष्ट्रवादीच्या आमदारांनी हजेरीपत्रावर केलेल्या सह्यांचा वापर सत्तास्थापनेसाठी केल्याचा आरोप अजित पवारांवर केला आहे. यामुळे अजित पवारांनी बंडखोरी केल्याने त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी भावूक होत व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवले आहेत. 

एकीकडे शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी भाजपाशीही बोलणी सुरू ठेवली होती. तर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचीही अजित पवारांच्या बंडाला साथ असल्याचे समजते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधिमंडळाचे राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यामुळे त्यांना आमदारांना मतदान करण्यासाठी व्हीप काढण्याचा अधिकार आहे. यामुळे ते तातडीने व्हीपही बजावू शकतात. तसेच त्यांना गटनेतेपदावरून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना बैठक घेऊन तसे पत्र विधानसभाध्यक्षांना द्यावे लागणार आहे. हे झाल्यानंतरच अजित पवार यांचे अधिकार संपुष्टात येतील.

तसेच विधानसभा अध्यक्ष निवड ही गुप्त मतदानाद्वारे घेतली जाते. यामुळे येत्या 3-4 दिवसांत तीन दिवसीय विधिमंडळ अधिवेशन बोलावले जाईल. यामध्ये विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल. यामुळे राष्ट्रवादीचे आमदार कोणाला मतदान करतात हे कळणार नाही. तसेच शिवसेनेचा एक गट फुटल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर येत आहे. तसेच पवार यांच्या शपथविधीनंतर मुंडे यांचा फोनही स्वीच ऑफ येत आहे. यामुळे धनंजय मुंडे, सुनिल तटकरे आदी नेते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे कळत आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारही अज्ञातस्थळी रवाना झाले असून राष्ट्रवादी, शिवसेनेची पत्रकार परिषद काही वेळातच होणार आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDhananjay Mundeधनंजय मुंडे