Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 11:18 IST2025-11-22T11:16:57+5:302025-11-22T11:18:00+5:30
Maharashtra CET 2026-27 schedule: राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी सामायिक प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी सामायिक प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार इंजिनीअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पीसीएम ग्रुपची एमएचटी सीईटीची पहिली प्रवेश परीक्षा ११ एप्रिल ते १९ एप्रिलदरम्यान, तर दुसरी प्रवेश परीक्षा १४ मे ते १७ मेदरम्यान होणार आहे. त्याचबरोबर कृषी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेली पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी पहिली प्रवेश परीक्षा २१ एप्रिल ते २६ एप्रिलमध्ये, तर दुसरी प्रवेश परीक्षा १० मे व ११ मे रोजी घेतली जाणार आहे.
सीईटी सेल यंदा एमबीए/ एमएमएस या अभ्यासक्रमासाठी पहिली प्रवेश परीक्षा ६ एप्रिल ते ८ एप्रिलदरम्यान, तर दुसरी प्रवेश परीक्षा ९ मे मध्ये घेणार आहे. त्याचबरोबर तीन वर्षीय विधीची प्रवेश परीक्षा १ व २ एप्रिलला, पाच वर्षीय विधीची प्रवेश परीक्षा ८ मे रोजी, नर्सिंगची प्रवेश परीक्षा ६ मे व ७ मे रोजी घेतली जाणार आहे. त्याचे हे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
या विषयांच्या दोनदा परीक्षा
| अभ्यासक्रम (Course) | प्रथम परीक्षा (First Examination) | द्वितीय परीक्षा (Second Examination) |
| एमएचटी सीईटी पीसीएम (MHT CET PCM) | ११ एप्रिल ते १२ एप्रिल | १४ मे ते १६ मे |
| एमएचटी सीईटी पीसीबी (MHT CET PCB) | २१ एप्रिल ते २६ एप्रिल | १० मे व ११ मे |
| एमबीए/एमएमएस (MBA/MMS) | ६ एप्रिल ते ८ एप्रिल | ९ मे |
प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक
| पदवी अभ्यासक्रम (Course) | प्रवेश परीक्षेच्या तारखा (Exam Dates) |
| एम.पी.एड (M.P.Ed.) | २४ मार्च |
| एमएड (M.Ed.) | २५ मार्च |
| एम.पी.एड (फिल्ड टेस्ट ऑफलाईन) | २५ मार्च |
| एम. एचएमसीटी (M.H.M.C.T.) | २५ मार्च |
| बी.एड. (B.Ed.) | २७ मार्च ते २९ मार्च |
| एमसीए (MCA) | ३० मार्च |
| एलएलबी ३ वर्ष (LLB 3 Years) | १ एप्रिल व २ एप्रिल |
| बी.पी. एड (B.P.Ed.) | ४ एप्रिल |
| बी. डिझाइन (B. Design) | ५ एप्रिल |
| बी.पी. एड (फिल्ड टेस्ट ऑफलाइन) | ५ एप्रिल ते ७ एप्रिल |
| बीएड व एमएड (इंटीग्रेटेड) | ९ एप्रिल |
| एएसी (फाईन आर्ट्स) (AAC Fine Arts) | १० एप्रिल |
| बी.एचएमसीटी/बीसीए/ बीबीए/ बीएमएस/बीबीएम | २८ एप्रिल ते ३० एप्रिल |
| डीपीएन / पीएचएन (वैद्यकीय) (DPN / PHN Medical) | ५ मे |
| नर्सिंग (Nursing) | ६ मे व ७ मे |
| विधी ५ वर्ष (Law 5 Years) | ८ मे |