शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

Maharashtra Cabinet Expansion: राजकीय वारसदारांची चांदी; मंत्रिमंडळ विस्तारात मिळाली संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 3:15 AM

महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय नेत्यांच्या वारसदारांना संधी मिळाल्याने दिसून येते.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय नेत्यांच्या वारसदारांना संधी मिळाल्याने दिसून येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाल्याने इतिहासात पहिल्यांदाच एका मंत्रीमंडळात बाप-लेक दिसणार आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणात विशिष्ठ राजकीय घराण्यांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहेत. तीच परंपरा पुढेही चालू आहे. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेले अनेक तरुण चेहरे हे अशाच घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे. ते सलग तीन वेळा लातूर (शहर) मतदारसंघातून निवडून आले असून यापूर्वी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. माजी मंत्री स्व. पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव सतेज उर्फ बंटी पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. श्रीवर्धन मतदारसंघातून त्या पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. काँग्रेसचे ज्येषठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांना दुसऱ्यांदा मंत्रीपद मिळाले आहे. यापूर्वी त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. यावेळी त्यांना कॅबिनेटमध्ये बढती मिळाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त तनपुरे, तसेच यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकरराव गडाख यांनाही संधी मिळाली आहे. हे दोन्ही युवा नेते अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. प्राजक्र तनपुरे हे जयंत पाटील यांचे नातलग आहेत.भाजप नेते राधाकृष्ण विखे यांची तिहेरी कोंडीकाँग्रेसचे माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या तिकीटावर ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आता त्यांची अहमदनगर जिल्ह्यात तिहेरी कोंडी केली गेली आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे आणि शिवसेनेकडून शंकरराव गडाख या तीन नेत्यांना मंत्रीपदे दिली गेली आहेत. त्यामुळे विखेंची गडाख-थोरात-तनपुरे यांनी मोठी राजकीय कोंडी केली आहे.१३ जिल्हे राहिले मंत्रिपदापासून ‘वंचित’महाविकास आघाडी सरकारमध्ये विदर्भासह सर्व विभागांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न झाला असला तरी राज्यातील बारा जिल्हे मंत्रिपदापासून वंचित राहिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख असे दोन कॅबिनेट मंत्री होते. मात्र, या सरकारमध्ये सोलापूरच्या वाट्याला एकही मंत्रीपद आलेले नाही.काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव मंत्रीपदासाठी चर्चेत होते. मात्र ऐनवेळी ते मागे पडले. उस्मानाबादमधून तानाजी सावंत (शिवसेना) यांचेही नाव चर्चेत होते. मात्र त्यांना संधी न मिळाल्याने ते नाराज झाले. पूर्व विदर्भातील अकोला, वाशिम या जिल्ह्यांना मंत्रीपद मिळाले नाही. पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार असताना एकालाही संधी मिळाली नाही. त्यामुळे संग्राम थोपटे नाराज झाले आहेत.मंत्रिमंडळात वंचित राहिलेले जिल्हे असे- पालघर, सोलापूर, गोंदिया, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, अकोला, वर्धा, धुळे, वाशिम, गडचिरोली आणि भंडारा.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेAshok Chavanअशोक चव्हाणAditi Tatkareअदिती तटकरेVishwajeet Kadamविश्वजीत कदमAmit Deshmukhअमित देशमुखSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील