भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा! गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावर नवी जबाबदारी

By प्रविण मरगळे | Updated: February 24, 2026 09:01 IST2026-02-24T08:56:32+5:302026-02-24T09:01:44+5:30

प्रत्येकाचे भाजपाच्या वाटचालीत योगदान वर्षानुवर्षाचे आहे याची कल्पना आहे. परंतु भाजपा प्रदेश पदाधिकारी करायचे ते अत्यंत मर्यादित पदाधिकाऱ्यांना संधी देता येते असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं.

Maharashtra BJP state executive announcement by Ravindra Chavan, New responsibility on Gopichand Padalkar, Krishnaraj Mahadik | भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा! गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावर नवी जबाबदारी

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा! गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावर नवी जबाबदारी

मुंबई - भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज महाराष्ट्रभाजपा प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. या प्रदेश कार्यकारिणीत अनेक नव्या चेहऱ्यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. त्याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर, कृष्णराज महाडिक यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी टाकली आहे. केशव उपाध्ये यांनाही कार्यकारिणीत बढती दिली असून यापुढे भाजपाच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी नवनाथ बन यांच्यावर टाकण्यात आली आहे. रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत आज प्रदेश कार्यकारणीतील नावांची घोषणा केली. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण म्हणाले की, काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय नेतृत्वाने माझ्याकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. त्यानंतरच्या काळात निवडणूक आचारसंहिता आणि एका पाठोपाठ एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणी, पदाधिकारी नेमणुका या निवडणुकीनंतर कराव्यात असा निर्णय भाजपाच्या राज्यातील प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांनी घेतला होता. काही महिने पदाधिकारी नेमणुकांबाबत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गृह मंत्री अमित शाह यांच्यापासून राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर मंडळींसोबत चर्चा केली असं त्यांनी सांगितले.

तसेच भाजपाच्या घटनेप्रमाणे आणि महाराष्ट्रातील परिस्थिती याचा विचार करता कुणाला पदाधिकारी करावे आणि कुणाला नाही यापेक्षाही भाजपाचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी प्रत्येक जण अतिशय सक्षम आहे. प्रत्येकाचे भाजपाच्या वाटचालीत योगदान वर्षानुवर्षाचे आहे याची कल्पना आहे. परंतु भाजपा प्रदेश पदाधिकारी करायचे ते अत्यंत मर्यादित पदाधिकाऱ्यांना संधी देता येते. मग अशावेळी ज्यांना कुणाला संधी मिळते त्यांचे सर्वजण अभिनंदन करतात. ज्यांची आज पदाधिकारी म्हणून नेमणूक होणार आहेत, त्याव्यतिरिक्त असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत ज्यांना संधी प्रदेश कार्यकारिणीत देता आली नाही. परंतु भाजपा आणि वेगवेगळ्या आयामांच्या माध्यमातून त्यांना कामाची संधी कशी देता येईल याचा सर्वांगीण विचार माझ्यासह सर्व पदाधिकारी नक्की करू अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. 

वाचा प्रदेश कार्यकारिणीत 'या' नेत्यांना मिळाली संधी

उपाध्यक्ष 

अतुल काळसेकर
भारती पवार
संजय कौडगे
संजय भेंडे
रामदास तडस
केशव उपाध्ये
प्रवीण पोटे
गोपीचंद पडळकर
चैतन्यबापू देशमुख
प्रिया शिंदे
सुजय विखे
अर्चना पाटील चाकूरकर

सरचिटणीस

निरंजन डावखरे
योगेश सागर
संजय कुटे
माधवी नाईक
राजेश पांडे
सुनील राणे

चिटणीस

प्रशांत ठाकूर - कोकण
मंगेश चव्हाण - उत्तर महाराष्ट्र
परिणय फुके - विदर्भ
वर्षा ढहाळे - पश्चिम महाराष्ट्र
संतोष जनाटे - कोकण
संजय जगताप - पश्चिम महाराष्ट्र
अर्चना डेहनकर - विदर्भ
रोहिणी नायडू - उत्तर महाराष्ट्र
राम सातपुते - पश्चिम महाराष्ट्र
प्रवीण घुगे - मराठवाडा
रेखा कुलकर्णी - मराठवाडा
भैरवी वाघ - उत्तर महाराष्ट्र

कोषाध्यक्ष 

मिहीर कोटेचा

सह कोषाध्यक्ष

अरुण लखानी

मुख्यालय प्रभारी

रवींद्र अनासपुरे

मुख्यालय सहप्रभारी

विश्वास पाठक

मुख्य प्रवक्ते

नवनाथ बन

भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष

कृष्णराज महाडिक

महिला मोर्चा अध्यक्ष 

चित्रा वाघ

किसान मोर्चा अध्यक्ष

रामकृष्ण वेताळ 

ओ. बी.सी मोर्चा अध्यक्ष

योगेश टिळेकर

एस. सी मोर्चा अध्यक्ष

विश्वजित गायकवाड

एस.टी मोर्चा अध्यक्ष

देवराव होळी

भटके विमुक्त मोर्चा अध्यक्ष

नरेंद्र पवार

अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्ष

इद्रिस मुलतानी

दरम्यान, भाजपाच्या कार्यपद्धतीत ३ वर्षात पदाच्या जबाबदाऱ्या बदलत असतात. प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता पूर्ण क्षमतेने काम करत असतो. कार्यपद्धतीप्रमाणे नवीन चेहऱ्यांसोबत अनुभवी चेहऱ्यांना संधी दिली आहे असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं. 

Web Title : भाजपा प्रदेश कार्यकारिणी घोषित: पडळकर, महाडिक को मिली नई जिम्मेदारी

Web Summary : भाजपा ने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी की घोषणा की, जिसमें गोपीचंद पडळकर और कृष्णराज महाडिक को नई भूमिकाएँ दी गईं। नवनाथ बन अब मुख्य प्रवक्ता हैं। रविंद्र चव्हाण ने कहा कि इस बदलाव में अनुभव और नए चेहरों को संतुलित किया गया है।

Web Title : BJP Announces State Executive: New Responsibilities for Padalkar, Mahadik

Web Summary : BJP announced its Maharashtra state executive, giving new roles to Gopichand Padalkar and Krishnaraj Mahadik. Navnath Ban is now the chief spokesperson. The revamp balances experience with new faces, said Ravindra Chavan.