शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

"आता संजय राठोडचा राजीनामा म्हणजे, सरकारचं तेलही गेलं अन्..."; भाजपचा उद्धव सरकारवर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 16:29 IST

राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. ...तर अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूजा चव्हाण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेलं, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला. (Maharashtra BJP Chief Spokesperson Keshav Upadhye commented on shiv sena minister sanjay rathod resigns)

मुंबई - पूजा चव्हान आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण पार ढवळून निघाले आहे. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप झाले. अखेर त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. आता संजय राठोडचा राजीनामा म्हणजे, सरकारचे तेलही गेले आणि तूपही गेले, अशा स्वरूपाचा आहे. असे त्यांनी म्हटले आहे. 

"आता संजय राठोडचा राजीनामा म्हणजे सरकारचं तेलपण गेलं, तुप पण गेलं, अशा स्वरूपाचा आहे. 15 दिवसांपूर्वीच राजीनामा घेतला असतां तर @OfficeofUT यांच्या बदद्ल ते संवेदनशील आहेत, हे पटल असतं. मात्र त्यांनी इतके दिवस लोकक्षोभ होईपर्यंत गप्प बसणं यातच त्यांची सत्ताअपरिहार्यता दिसून येते. म्हणूनच आता राजीनाम्याने राठोड गेले, पण सरकारचा खरा चेहराही समोर आला. सरकारच्या हाती असंवेदनशीलतेचं धुपाटण राहिलं. पूजा चव्हाणला न्याय मिळावा यासाठी भाजपचा संघर्ष सुरूच राहिल." असे केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

"फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा"

...तर विधिमंडळाच्या अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही -राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर विधिमंडळाच्या अधिवेशनात कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही भाजपने दिला होता. एवढेच नाही, तर अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूजा चव्हाण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला.

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या, संजय राठोडांच्या ‘त्या’ १० चुका अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश

राऊतांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली राजधर्माची आठवण -शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच माध्यमांशी बोलताना राठोड यांच्या राजीनाम्याबद्दलचे संकेत दिले होते. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याप्रकरणी काही डोळे मिटून बसलेले नाही. ते यावर निर्णय घेतील,' असे सूचक विधान राऊत यांनी केले होते. यानंतर आज सकाळी राऊत यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण करून दिली होती.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पहिला गुन्हा दाखल होणार; चुलत आजी शांताताई राठोड नोंदवतायेत जबाब

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाणBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना