शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

‘महाराष्ट्र बंद’ला मुंबईत लागले हिंसक वळण, पोलीस ठाण्यावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 5:24 AM

कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदने मुंबईत हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी दुकाने बंद करण्यासोबतच खासगी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करीत पोलीस ठाण्यांवरही दगडफेक केली.

मुंबई - कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदने मुंबईत हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी दुकाने बंद करण्यासोबतच खासगी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करीत पोलीस ठाण्यांवरही दगडफेक केली. आंदोलनकर्ते हिंसक झाल्याने मुंबईत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. असे असले तरी मुंबई पोलिसांनी संयम राखत लाठीचार्ज न करताही जमाव नियंत्रित राहील याची काळजी घेतली. तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी २५० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.आंदोलनादरम्यान, विक्रोळी गोदरेज कंपनीच्या गेटपासून ते गांधीनगर जंक्शन परिसरातील एकामागोमाग एक अशा २००हून अधिक खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. तर भांडुप ते पवईच्या दिशेनेही रस्त्याकडेला पार्क केलेल्या खासगी बसेस आणि बेस्ट बसेस आंदोलकांनी लक्ष्य केल्याचे पाहावयास मिळाले. रेल रोको, रास्ता रोकोवर नियंत्रण आणताना पोलिसांची दमछाक झाली. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. अशात पवईच्या हिरानंदानी आणि आयआयटी परिसराबाहेर दुपारी तणाव वाढला. आंदोलकांनी खासगी सोसायटीतील सामानाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रहिवासी आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. अशात येथील काही आंदोलकांना पवई पोलिसांनी ताब्यात घेतले. याच्या निषेधार्थ आंदोलकांनी पवई पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांच्यासह पोलीस अंमलदार शेलार, साठे, परब, कोळी, घोळवे, वाव्हळ, बादकर, कदम, जाधव आणि घोडेस्वार असे एकूण ११ जण जखमी झाले आहेत.चेंबूरच्या खारदेवनगरात दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात दगडफेक झाली. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गेलेल्या गोवंडी पोलीस ठाण्याच्या १ क्रमांकाच्या गाडीची तोडफोड करत पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली. यामध्ये सपोनि घोडे, घाडगे, अहिरे, जाधव तसेच चंद्रकांत निकम, मल्हारी मलबे, राजेंद्र पाटील, सोमनाथ सिंग, सागर जगताप, पूनम जोदे, धोंडीराम सरगर, किशोर भामरे, अजित तडवी, जीवन मोहिते हे पोलीस जखमी झाले. मुंबईतील अन्य भागांतही जमावावर नियंत्रण आणताना काही पोलीस किरकोळ जखमी झाले. तर तोडफोडीमध्ये काही बसचालक जखमी झाले.पोलिसांचा आंदोलकांवर हवा तसा दबाव पाहावयास मिळाला नाही. मात्र त्यांनी जमाव नियंत्रित राहील यासाठी विशेष नियोजन केले होते. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवणे शक्य झाले.आंदोलकांवर गुन्हे दाखलआंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांचे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. आतापर्यंत मुंबईतून पोलिसांनी २५० जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अन्य आंदोलकांची माहिती मिळविण्यात येत आहे. या प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती प्रभारी पोलीस प्रवक्तेसचिन पाटील यांनी दिली.फूटेजच्या आधारे तपाससीसीटीव्ही, माध्यम प्रतिनिधी, रहिवासी, पोलिसांनी केलेल्या व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या आधारे तसेच सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून पोलीस तपास सुरू आहे.‘लाइफ लाइन’ कोलमडलीमुंबई : धावत्या मुंबईकरांची लाइफलाइन असलेली रेल्वे सेवा हे आंदोलनकर्त्यांचे प्रमुख लक्ष्य होते. बुधवारी महाराष्टÑ बंदच्या पार्श्वभूमीवर मध्यसह हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील बहुतांशी स्थानकांत ‘रेल रोको’ झाला. त्यामुळे मुंबईकरांची लाइफ लाइन कोलमडली.मध्य रेल्वेच्या मेन मार्गावर कल्याण-डोंबिवलीसह कांजूर मार्ग, घाटकोपर, विक्रोळी, दादर या रेल्वे स्थानकांवर रेल रोको झाला. तर हार्बर मार्गावर गोवंडी, चेंबूर स्थानकांवर आंदोलनकर्त्यांमुळे लोकलला ब्रेक लागला. जमावाने सर्वांत आधी गोवंडी स्थानकावर धाव घेतली. सरकारच्या निषेधाच्या घोेषणा देत आंदोलकांनी रेल रोको केला. रेल्वे सेवा कोलमडल्याने अनेकांनी रेल्वे रुळावरून चालत जाणे पसंत केले.पश्चिम रेल्वेच्या दादर, माहीम, दहिसर, गोरेगाव, मालाड आणि अंधेरी येथेदेखील मोठ्या संख्येने जमाव रेल्वे रुळावर उतरला. कर्णावती व डबलडेकर एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली. सायंकाळी बंद मागे घेण्यात आला आणि मंदावलेली लाइफलाइन हळूहळू ट्रॅकवर आली.मध्य रेल्वे : ११० लोकल फेºया रद्द, ३० विशेष लोकल फेºयापश्चिम रेल्वे : ६० फेºया रद्द,२०० लोकल फेºयांना लेटमार्कबेस्टची तोडफोड मुंबई : बंदच्या काळातही सामान्य मुंबईकरांसाठी रस्त्यावर उतरून बेस्ट उपक्रमाने दिलासा दिला. मात्र महाराष्ट्र बंदचा मोठा फटका आधीच आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला सोसावा लागला. गेल्या दोन दिवसांत बेस्टच्या तब्बल १७३ बसगाड्या फोडण्यात आल्या. तर ठिकठिकाणी झालेल्या दगडफेकीत बेस्टचे चार बसचालक जखमी झाले.कोरेगाव-भीमा प्रकरणी आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या काळात तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. तरीही संवेदनशील भागातील काही बसगाड्यांना जाळ्या लावून त्या सेवेसाठी आगाराबाहेर काढण्यात आल्या. बेस्ट उपक्रमातील एकूण ३३७० बसेसपैकी ३२०८ बसेस आज रस्त्यावर उतरविण्यात आल्या होत्या. मात्र प्रतीक्षानगर, वरळी नाका, चेंबूर, मुलुंड, पवई, सांताक्रुझ आदी ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेक झाली.या घटनांमध्ये बसच्या काचा लागून चार चालक जखमी झाले. त्यांच्यावर तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. जखमी चालकांची प्रकृती स्थिर आहे. मात्र या दगडफेकीच्या घटनांमध्ये बुधवारी बेस्टच्या ९० बसेसचे तर मंगळवारच्या घटनांमध्ये ८३ बसेसचे नुकसान झाले. अशा एकूण १७३ बसेसच्या काचा फुटल्या व टायर फाटले आहेत.बेस्टची तोडफोड१७३ बसेसचे नुकसान : चार बसचालक जखमीजखमीबसचालकांची नावेआसारजी विश्वनाथ गरजेडेपो - प्रतीक्षानगर,अरुण गणपत मिरगळडेपो - मध्य मुंबईनितीन कमलाकर वाघमारेडेपो - मजासशशिकांत गणपत गोसावीडेपो - सांताक्रुझमंत्रालयातही शुकशुकाटभारिप बहुजन महासंघ आणि डाव्या संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे मंत्रालयातही शांतता पाहायला मिळाली. एरव्ही, मंगळवार आणि बुधवारी राज्यभरातून आपली निवेदने आणि मागण्यांसाठी नागरिक मंत्रालयात मोठी गर्दी करतात.बुधवारी मात्र, मंत्रालयात येणाºयांची संख्या तुरळकच होती. शिवाय, बंदमुळे रस्ते व उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने, मंत्रालयातील कर्मचाºयांचीही संख्या रोडावली होती. अर्थात, सुरक्षेच्या दृष्टीने मंत्रालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBhima-koregaonभीमा-कोरेगाव