शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

Maharashtra Bandh : बंद आणि विरोध यांचा 'धंदा', गोळा होतो त्यावरच 'चंदा'; महाराष्ट्र बंदवरून भाजपचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 9:22 AM

Maharashtra Bandh : लखीमपूर खेरी येथे घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे.

ठळक मुद्देलखीमपूर खेरी येथे घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

लखीमपूर खेरी येथे घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली. महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) राज्यभरात हा बंद पुकारला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना शांततेत बंद करावा असं आवाहन करण्यात आलं. दरम्यान, यावरून भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "बंद आणि विरोध यांचा 'धंदा', गोळा होतो त्यावरच 'चंदा'," असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi Government) टोला लगावला.

"बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवलx त्या तथाकथित 'बंदसम्राटांचा' पुन्हा आज इतिहास आठवा. मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उद्ध्वस्त केलं, युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी श्रमिकांना देशोधडीला लावलं," असं म्हणत शेलार यांनी निशाणा साधला. "एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलंय. कोस्टल रोडला विरोध, नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध, मेट्रोचेही हे विरोधकच, हे तर विकासातील गतीरोधक! बंद आणि विरोध यांचा 'धंदा' गोळा होतो त्यावरच 'चंदा'!," असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.  "आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद. ही तर तिघाडीतील तीन पक्षांची 'महिषासुरी' चाल. आई  दुर्गामाते जनतेला दे 'बळ'! उधळून टाकील जनता या महिषासुरांचा हा 'खेळ'!," असंही म्हणत शेलार यांनी जोरदार टीका केली. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारMaharashtra BandhMaharashtra Bandh