शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

चार महिन्यांनी पद मिळाले असते, म्हणून घरच मोडायचे का? शरद पवारांचा अजितदादांबाबत दावा, प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 14:57 IST

Sharad Pawar Attacks on Ajit pawar: सत्ता नाही म्हणून या लोकांनी साथ सोडली. काही लोकांनी तर उद्योगच केला. पहाटेच जाऊन राज्यपालांना उठविले, कशासाठी? असा टोला शरद पवार यांनी अजित पवारांना लगावला. 

अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघातील सभेत भावूक होऊन डोळ्यात अश्रू आणण्याची शरद पवार यांनी आज बारामतीतच नक्कल करून दाखविली आहे. यानंतर शरद पवारांनीअजित पवारांच्या घर फोडण्याच्या आरोपावर प्रत्यूत्तर दिले आहे. 

या निवडणुकीत नव्या पिढीला निवडून द्या, आम्ही युगेंद्रचा निर्णय घेतला आहे. मी तेव्हा मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेतली आणि नव्या पिढीच्या हातात पक्षाचा अधिकार दिला. सत्ता नाही म्हणून या लोकांनी साथ सोडली. काही लोकांनी तर उद्योगच केला. पहाटेच जाऊन राज्यपालांना उठविले, कशासाठी? असा टोला शरद पवार यांनी अजित पवारांना लगावला. 

अनेकांना मंत्री केले, पदे दिली. सुप्रियाला कधी एकतरी पद दिले का? तिनेही कधी मागितले नाही. कारण घर एकत्र ठेवण्याचे काम आम्ही केले. तुम्हाला चार महिन्यांनी पद मिळालेच असते, पण पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असते का? असा सवाल करत घर मोडणे माझा स्वभाव नाही, असे प्रत्यूत्तर शरद पवारांनी अजित पवार यांच्या घर फोडण्याच्या आरोपांवर दिले. 

राष्ट्रवादी हा पक्ष कोणी काढला, मी. काही लोकांनी आमच्यावरच खटला दाखल केला. हा पक्ष माझा नाही तर त्यांचा असल्याचा दावा केला गेला. कोर्टाने माझ्या नावे समन्स काढले. मी समन्स कधी पाहिला नव्हता. कधी कोर्टात गेलो नव्हतो. कोर्टाने निकाल दिला पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याचे, याच्याशी सरद पवारांचा काही संबंध नाही. आम्हाला नवीन चिन्ह दिले गेले, आम्ही त्यावरही मते मागितली, असे शरद पवार म्हणाले.

अजित पवार काय म्हणालेले...आई सांगतेय, माझ्या दादाच्या विरोधात कोणीही फॉर्म भरू नका. या पद्धतीने जे चाललंय ते बरोबर नाही. मग, याबाबत कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने यामध्ये सांगायला पाहिजे होते. त्यांना फाॅर्म भरायला कोणी सांगितला होता, ‘साहेबां’नी सांगितले, मग आता साहेबांनी तात्यासाहेबांचे घर फोडले, असे म्हणायचे का? या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला; यावेळी अजित पवार यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामती