भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 10:14 IST2025-07-05T10:12:01+5:302025-07-05T10:14:57+5:30

भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी याबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. जमिनीची बिगरशेती परवानगी न घेता, लेआऊट न करता, नजराणाही न भरता तसेच तुकडाबंदी कायदा असतानाही या जमिनीचे १६ तुकडे करून व्यवहार करण्यात आले, असे पडळकर म्हणाले.

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 Plot scam One officer suspended, 8 people questioned; Malegaon incident; Criminal action against two stamp vendors | भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई

भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई

मुंबई : मालेगाव (जि. नाशिक) येथील मौजे संगमेश्वर आणि गुगळगाव येथील भूखंड अदलाबदलीतील गैरव्यवहार प्रकरणी   उपविभागीय अधिकारी  (एसडीओ) उदय किसवे यांना निलंबित करण्याची आणि  मुद्रांक अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. स्टॅम्प व्हेंडर जाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?

भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी याबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. जमिनीची बिगरशेती परवानगी न घेता, लेआऊट न करता, नजराणाही न भरता तसेच तुकडाबंदी कायदा असतानाही या जमिनीचे १६ तुकडे करून व्यवहार करण्यात आले, असे पडळकर म्हणाले. ही वस्तुस्थिती असल्याचे बावनकुळे यांनी मान्य केले. ही जमीन बैलगोठ्याकरिता खरेदी केल्याचे दाखविले. मात्र बांधकाम परवानगी महापालिकेने दिलेली नाही.

अदलाबदलीत नियमभंग

पडळकर यांनी   मौजे संगमेश्वर येथील सिटी सर्व्हे क्र. १४४ अ आणि मौजे गुगळगाव येथील गट क्र. २५३ या जमिनींबाबत झालेल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला.

२००२ च्या परिपत्रकानुसार, भूखंड किंवा शेतीच्या अदलाबदलीसाठी जमिनी सलग असणे आवश्यक आहे. परंतु, उदय किसवे यांनी संगमेश्वरची जमीन गुगळगावला आणि गुगळगावची जमीन संगमेश्वरला अदलाबदली करून नियमांचा भंग केला.

यामुळे त्यांचे निलंबन करत एका महिन्याच्या आत विभागीय चौकशी पूर्ण करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.

चुकीच्या दस्तनोंदणीद्वारे अधिकारांचा गैरवापर

 पडळकर यांनी सभागृहात सांगितले की, या जमिनीचे १६ विभाग आणि २७२ तुकडे करून तुकडेबंदी कायद्याचे तसेच एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन झाले आहे. २०१३ ते २०१९ या काळात २५८ अनधिकृत दस्तनोंदणी झाली. या प्रकरणात मुद्रांक अधिकारी भुरके, गावित, कापडण्या, गुप्ते, हिरे, कळसकर, मोतीराळे आणि वाणी यांनी चुकीच्या दस्तनोंदणीद्वारे अधिकारांचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे.

 महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, की या सर्व आठ अधिकाऱ्यांवर प्राथमिक चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई पूर्ण केली जाईल, असे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले. या गैरव्यवहारात स्टॅम्प व्हेंडर जाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ यांनीही साथ दिल्याचे

निदर्शनास आले असून, त्यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

Web Title: Maharashtra Assembly Monsoon Session 2025 Plot scam One officer suspended, 8 people questioned; Malegaon incident; Criminal action against two stamp vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.