विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 18:56 IST2025-07-16T18:55:11+5:302025-07-16T18:56:21+5:30
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: आज विधिमंडळाच्या आवारामध्ये भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात तुफान राडा झाला.

विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोपांसह इतर विविध कारणांमुळे वादळी ठरत आहे. त्यात आज विधिमंडळाच्या आवारामध्ये भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात तुफान राडा झाला. यावेळी गोपिचंड पडळकर यांनी जितेंद्र आव्हा यांना शिविगाळ केली. तर आव्हाड यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे विधिमंडळाच्या परिसरात काही काळ वातावरण तंग झाले.
विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासूनच भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात आरोप प्रत्यारोप होत होते. त्यात काही दिवसांपूर्वी गोपिचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाबाबत केलेल्या टिप्पणीवरून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. तसेच विधान भवनात जात असणाऱ्या पडळकर यांना त्यांचं नाव न घेता घोषणाबाजी करत डिवचण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.
दरम्यान, आज गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड हे आमने सामने आले. विधान भवनाच्या गोपिचंद पडळकर यांनी कारमधून उतरत असताना कारचा दरवाजा जोरात ढकलल्याने तो आपल्याला लागल्याचा दावा आव्हाड यांनी केला. त्यावरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिविगाळ करत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे व्हिडीओही समोर आले असून, त्यातील एका व्हिडीओत आमदार गोपिचंद पडळकर हे ‘’*** दम असेल तर समोर ये, मी एकटाच आहे, तुझ्यासारखी ** घेऊन फिरत नाही, असे बोलत असल्याचे ऐकू येत आहे.