शहरं
Join us  
Trending Stories
1
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
2
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
4
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
5
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
6
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
7
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
8
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
9
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
10
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
11
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
12
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
13
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
14
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
15
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
16
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
17
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
18
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
19
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
20
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?

"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 18:14 IST

Vinod Tawade vs Rahul Gandhi, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पैसे वाटपाच्या आरोपावरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता

Vinod Tawade vs Rahul Gandhi, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक आहे. महाराष्ट्रात उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यादरम्यान आज विरारमधील हॉटेल विवांतामध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी आले असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. तर या हॉटेलमधून १० लाखांची रोख मिळाली असून अनेक डायऱ्याही सापडल्या अन् त्यात व्यवहाराच्या नोंदी असल्याचा दावा स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला. या साऱ्या गोंधळात राहुल गांधी यांनी तावडे प्रकरणावरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. त्याला विनोद तावडे यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

राहुल गांधींचे ट्विट काय?

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. विनोद तावडे हे एका पिशवीत पैसे घेऊन तेथील लोकांना बोलावून पैसे वाटून घेत होते. ही बातमी समजताच मोठा गोंधळ उडाला. विनोद तावडेंचे या संदर्भातील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. या गोंधळावर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेली पोस्ट शेअर केली आणि सवाल केले. 'मोदीजी, हे ५ कोटी रुपये कोणाच्या सेफमधून बाहेर आले? जनतेचे पैसे लुटून तुम्हाला टेम्पोमध्ये कोणी पाठवले?' असा थेट सवाल राहुल गांधी यांनी केला. 'महाराष्ट्रात मतदान होण्याआधीच भाजपाचे नेते पैशाच्या जोरावर निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यात कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करावी', अशी पोस्ट काँग्रेसने केली. तीच पोस्ट राहुल गांधी यांनी त्यांच्या हँडलवर शेअर केली.

विनोद तावडे यांचे प्रत्युत्तर

विनोद तावडे यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटरपोस्ट वर उत्तर दिले. 'राहुल गांधी जी, तुम्ही स्वत: नालासोपारा येथे या, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासा, येथे निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईचा आढावा घ्या आणि मग सिद्ध करा की इथे तुम्ही म्हणताय तशा प्रकारे पैसे आले आहेत. कुठल्याही गोष्टीची पूर्ण माहिती न घेता अशा प्रकारचे विधान करणे हा पोरकटपणा नाही तर दुसरं काय आहे,' अशा शब्दांत विनोद तावडे यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, या संदर्भात निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. तावडे यांच्यासह भाजपा उमेदवार राजन नाईक यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nalasopara-acनालासोपाराVinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीKshitij thakurक्षितिज ठाकूरthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024