शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

तीन योगेश कदम, तीन संजय कदम, दापोलीत सहा कदम रिंगणात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 06:12 IST

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडी आणि महायुतीने नामसाधर्म्याचे उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे. दापोली मतदारसंघात तब्बल तीन संजय कदम आणि तीन योगेश कदम रिंगणात उतरले आहेत.

 रत्नागिरी -  महाविकास आघाडी आणि महायुतीने नामसाधर्म्याचे उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे. दापोली मतदारसंघात तब्बल तीन संजय कदम आणि तीन योगेश कदम रिंगणात उतरले आहेत. त्याशिवाय चिपळूण मतदारसंघात दोन शेखर निकम आणि दोन प्रशांत यादव निवडणूक लढवत आहेत. महत्त्वाचे म्हणजे नामसाधर्म्य असणारे सर्व अर्ज शेवटच्या दिवशीच दाखल झाले.

पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात त्याच्या नावासारखे नाव असलेला दुसरा उमेदवार उभा करण्याची पद्धत गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये रायगड मतदारसंघात वापरण्यात आली होती. या लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघातही यावेळी हाच प्रकार करण्यात आला आहे.

दापोलीमध्ये उद्धवसेनेकडून संजय कदम आणि शिंदेसेनेकडून विद्यमान आमदार योगेश कदम रिंगणात आहेत. येथे संजय कदम नावाच्या दोन आणि योगेश कदम नावाच्या दोन अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

चिपळूणमध्ये दोन निकम आणि दोन यादवदापोली प्रमाणेच चिपळूण मतदारसंघातही सारख्याच नावाचे उमेदवार आहेत. येथे शेखर निकम (अजित पवार गट) आणि प्रशांत यादव (शरद पवार गट) उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेखर निकम (अपक्ष) आणि प्रशांत यादव (अपक्ष) असे अर्ज दाखल झाले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४dapoli-acदापोलीShiv SenaशिवसेनाYogesh Kadamयोगेश कदम