शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

"राज्यात तिसरी आघाडी बनवून..."; अजित पवार-राज ठाकरेंबाबत रोहित पवारांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 17:10 IST

महायुतीचे आकडे कुठेच जुळेना यासाठी राज्यात तिसरी आघाडी बनवली जाऊ शकते. त्यातून मविआचे मते खायचं काम ही आघाडी करेल असा आरोप रोहित पवारांनी केला.

नवी दिल्ली - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं अजित पवार गुलाबी यात्रेत माझी लाडकी बहिण योजना करतात. त्याच यात्रेत अजितदादा वेगळी भूमिका घेतायेत. आज आंदोलनाला सुरुवात होते त्यामुळे राज्यात तिसरी आघाडी निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यात मनसेही येऊ शकते. त्यात अजून पक्षसोबत येतील. या सर्वांचे काम सुपारी घेऊन महाविकास आघाडीची मते खायची हेच काम असेल असा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे.

दिल्लीत पत्रकारांशी ते बोलत होते. रोहित पवार म्हणाले की, दिल्लीवरून फर्मान आलं असावं, आता आपलं कुठलेच गणित बसेना, महायुतीला कुठेच आकडे मिळेना. तर मग तिसरी आघाडी काढू. अजित पवार आणि त्यांचा पक्ष त्यासाठी पुढाकार घेईल. त्याला मनसे आणि इतर पक्ष जोडले जातील. या तिसऱ्या आघाडीचं काम शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची मते खायची इतकेच असणार आहे. निवडून आले नाही तरी चालेल पण मते खायची. त्याची सुरुवात आज अजित पवारांच्या आंदोलनापासून झाली आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच तुमचे लोक पैसा खाण्यासाठी एकत्र आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही वेगळी भूमिका घेत असाल तर कदाचित तिसऱ्या आघाडीची सुरुवात झाली असं बोलावे लागेल. आज आंदोलन केले, उद्या भाजपाविरोधात बोललं जाईल. मग हळूहळू आम्हाला इतक्याच जागा हव्यात, १०० जागा हव्यात मग भाजपा म्हणणार २० जागा देतो. मग त्यातून ते वेगळे होतील आणि इतर २-३ पक्षांना घेऊन सुपारीबाज पक्षांची संघटना होईल आणि ती आघाडी मते खाण्यासाठीच होईल अशी चर्चा होईल. भाजपा हुशार आहे. दिल्लीत बसून समीकरण बनवतात. असेच समीकरण लोकसभेला केले. काही पक्षांना वेगळे उभे केले. परंतु २०१९ एवढी मते त्यांना मिळाली नाहीत. महाराष्ट्राच्या लोकांना भाजपाची स्ट्रॅटर्जी कळाली आहे. त्यामुळे किती आघाडी उघडली तरी त्यांना यश येणार नाही असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान,  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तिथे अजित पवारांनी माफी मागितली हे चांगली बाब. परंतु आम्ही ६ हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा काढला त्यात माफी मागता येत नाही. बदलापूरला जिथं लहान मुलींवर अन्याय झाला, महिलांवर अत्याचार होतायेत तिथे माफी मागता येत नाही. तुमचे मित्रपक्ष भाजपा थोर व्यक्तींवर बोलतात तिथे तुम्ही काही बोलत नाही. एमआयडीसीत जो भ्रष्टाचार होतो तिथे तुम्हाला माफी मागता येत नाही. जे प्रकल्प गुजरातला जातात तेव्हा माफी मागता येत नाही. हिंमत असेल तर ज्या चुका महायुती सरकारने केल्या त्याबाबत अजित पवारांनी उघडपणे सभा घ्याव्यात असा इशारा रोहित पवारांनी अजित पवारांना दिला. 

...आम्ही कुठे शांत बसणार?

बदलापूरला दुर्दैवी घटना घडली त्याचा विरोध करण्यासाठी सामान्य माणसांसह आम्ही रस्त्यावर उतरलो तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही राजकारण करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यात भ्रष्टाचार झाला तर त्याचा विरोध आम्ही करणारच, त्यांचे गावगुंड येऊन तमाशा करणार असतील तर आम्ही कुठे शांत बसणार आहे? तो पुतळा २ कोटी खर्च करून बनवला. उद्धाटनाला मोदींच्या हेलिपॅडसाठी अडीच कोटी खर्च केले. मोदींना खुश करण्यासाठी ७५ लाखांचा खर्च केला. ५० हजार कोटींचा भ्रष्टाचार या सरकारने गेल्या २ वर्षात केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातही भ्रष्टाचार करतायेत असा निशाणा रोहित पवारांनी सरकारवर साधला. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवारMNSमनसेBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी