शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

"माझ्याविरुद्ध कितीही चक्रव्यूह रचले तरीही..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 14:35 IST

विरोधकांच्या टीकेवरून देवेंद्र फडणवीसांना हल्लाबोल, माझ्याविरोधात सगळे मिळून चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न करतायेत

मुंबई - माझ्याविरुद्ध कितीही चक्रव्यूह रचले तरीही मी अभिमन्यू होणार नाही. मी आधुनिक अभिमन्यू चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे मला माहिती आहे असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांच्या बातमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी काही माध्यमात बातमी पाहिली, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी फक्त देवेंद्र फडणवीसांना हल्ला करा. ही आनंदाची गोष्ट आहे. यातून तुमचं राजकारणातील स्थान किती बळकट आहे याचा अंदाज येतो. सगळ्यांना मिळून एकाच व्यक्तीवर हल्ला करावा वाटतं, उद्धवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस तेच करते. हे माझ्याविरुद्ध चक्रव्यूह तयार करतायेत. तुम्ही चक्रव्यूह तयार करून मला अभिमन्यू करायचा प्रयत्न करत असला तरी मी आधुनिक अभिमन्यू आहे त्यामुळे चक्रव्यूहात शिरायचं कसं आणि त्यातून बाहेरही यायचं मला माहिती आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मी अभिमन्य होणार नाही असं त्यांनी सांगितले. 

काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना जागा दाखवली

सर्व्हे लीक होत नाहीत, टेबलावर बसून केलेला सर्व्हे तो त्यांनी लीक केला. उद्धव ठाकरे आणि आमचे पटत नसले तरी सांगतो, हा जो काही सर्व्हे तो उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवण्याकरता तयार केलेला आणि लीक केलेला सर्व्हे आहे. दुसरा या सर्व्हेत काही अर्थ नाही. त्यांना हे दाखवून द्यायचे होते की, कुठे तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याचं बोलताय, तुम्ही चौथ्या-पाचव्या नंबरवर चालले आहात. उद्धव ठाकरेंना काँग्रेसनं सर्व्हेतून जागा दाखवली. उद्धव ठाकरे ३ दिवस दिल्लीत जाऊन बसले. त्यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून घोषित व्हावा असा त्यांचा आग्रह होता. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे आम्ही दिल्लीला जात असतो, परंतु आमच्या दिल्ली दौऱ्यावर किती टीका, पण हे ३ दिवस दिल्लीत बसले, सोनिया गांधींना भेटले परंतु त्यांनी फोटो काढायला परवानगी दिली नाही. बैठकीचा फोटोही बाहेर आला नाही. एवढे होऊन ते पुन्हा इथं आले, काही घोषित झाले नाही अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.  टीव्ही ९ च्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते

शरद पवारांच्या डोक्यात ठाकरेंचा चेहरा नाही. 

आता तर शरद पवारांनी स्पष्टपणे घोषित केले मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार नाही आणि त्यावर नाना पटोलेंनी लगेच री ओढली मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात जे आहे ते नाकारलं आहे. शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे हे शिजतंय. त्यांच्या डोक्यात जे काही ३-४ चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

राजकोट प्रकरणी जबाबदारी झटकली नाही 

सिंधुदुर्ग राजकोट प्रकरणी माझे पूर्ण विधान ऐकले तर त्यात मी कुठेही जबाबदारी टाळली नाही. PWD नं भ्रष्टाचार केल्यामुळे हा पुतळा पडला असा मला प्रश्न विचारला तेव्हा हा PWD नं तयार केलेला पुतळा नाही नौदलाने तयार केलेला पुतळा आहे. नौदलाचा हेतूही चुकीचा असू शकत नाही. हे एकमेकांवर टाळण्याचा प्रयत्न नाही. पुतळा पडला ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. या मुळाशी जावं लागेल. त्यात कुठल्या चूका झाल्या असतील त्या सुधाराव्या लागतील आणि महाराजांचा तिथेच भव्य पुतळा उभारावा लागेल. मी कुठेही हात झटकण्याचं काम केलं नाही. पंतप्रधानांनी, मुख्यमंत्र्यांनी, अजितदादा आणि मीही माफी मागितली. महाराष्ट्रातील जनतेची, शिवप्रेमींची माफी मागितली त्यामुळे कुठेही जबाबदारी झटकली नाही. ही घटना लाजिरवाणी आहे असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSupriya Suleसुप्रिया सुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४