शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 11:26 IST

Maharashtra Assembly Election 2024: सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांनी या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सर्व प्रसिद्धीसाठी सुरू असल्याचं समोर येताच आम्ही रेकॉर्डवर घेतलं नाही, अशा गौप्यस्फोट चांदिवाल आयोगाचे प्रमुख न्यायूर्ती चांदिवाल यांनी केला आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असतानाच तीन वर्षांपूर्वी गाजलेल्या १०० कोटी वसुलीचं प्रकरण, वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत सनसनाटी माहिती समोर आली आहे. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांनी या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सर्व प्रसिद्धीसाठी सुरू असल्याचं समोर येताच आम्ही रेकॉर्डवर घेतलं नाही, अशा गौप्यस्फोट चांदिवाल आयोगाचे प्रमुख न्यायूर्ती चांदिवाल यांनी केला आहे. 

आज एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत न्यायमूर्ती चांदिवाल यांनी अनेक गौप्यस्फोट केले. त्यात सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्याबाबत माहिती देताना न्यायमूर्ती चांदिवाल म्हणाले की,  सचिन वाझे याने जे शपथपत्र दिलं, त्या शपथपत्राअनुरूप पुरावे त्याने दिले असते, तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला असता. सचिन वाझे याने त्याच्या शपथपत्रात दोन राजकीय व्यक्तींची नावं घेतली होती. सचिन वाझे याने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नावं घेतली होती. तेव्हा मी हे रेकॉर्डवर घेणार नाही, असं सचिन वाझे याला सांगितलं. तसेच सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. पण ते मी रेकॉर्डवर घेतलं नाही, अशी माहिती न्यायमूर्ती चांदिवाल यांनी दिला. 

दरम्यान, या प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिलेली नाही. तसेच मी या अहवालात क्लीनचिट दिलेली नाही. परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी त्यांच्याकडे पुरावे असूनही ते पुरावे आमच्याकडे दिले नाहीत. जर पुरावे दिले असते तर काहीतरी नक्कीच घडलं असतंस असेही न्यायमूर्ती चांदिवाल यांनी सांगितले. त्याबरोबरच हा अहवाल कधी प्रसिद्ध करायचा हे सरकारच्या हातात आहे. माझ्या अहवालात अशा काही गोष्टी असतील ज्या कुठल्याही सरकारच्या पचनी पडणाऱ्या नाहीत. तसेच या अहवालामधून मी काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना दिली होती, असेही चांदिवाल यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Deshmukhअनिल देशमुखsachin Vazeसचिन वाझेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार