शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 14:55 IST

Maharashtra Assembly Election 2024: केवळ निवडणुकीत मते मिळविण्यासाठी राहुल गांधी शेतकऱ्यांना भाववाढीचे स्वप्न दाखवित आहेत. काँग्रेसने आधी कर्नाटकात सोयाबीनला सात हजार रुपयांचा भाव मिळवून द्यावा, असे आव्हान भाजपा नेते अनिल बोंडे यांनी काँग्रेसला दिले आहे.  

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मराठवाडा आणि विदर्भामधील प्रचारामध्ये सोयाबीनचे कोसळलेले भाव हा कळीचा मुद्दा ठरला. तसेच सोयाबीनच्या भावावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत होती दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विदर्भातील प्रचारसभांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजार रुपयांचा भाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारात साधारणत: ३ हजार ७५१ रुपये प्रति क्विंटलचा दर दिला जात आहे. हा भाव हमीभावापेक्षा जवळपास १ हजार १४१ रुपयांनी हे दर कमी आहेत. केवळ निवडणुकीत मते मिळविण्यासाठी राहुल गांधी शेतकऱ्यांना भाववाढीचे स्वप्न दाखवित आहेत. काँग्रेसने आधी कर्नाटकात सोयाबीनला सात हजार रुपयांचा भाव मिळवून द्यावा, असे आव्हान भाजपा नेते अनिल बोंडे यांनी काँग्रेसला दिले आहे.

जगात वर्षाला ३५ कोटी टन सोयाबीनचे उत्पादन होते. यातील भारताचा वाटा साधारणत: एक कोटी टनपर्यंत आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक ५५ लाख हेक्टरवर तर महाराष्ट्रात ४५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते. मध्य प्रदेशात ५०.६० लाख टन तर महाराष्ट्रात ४०-४५ लाख टन उत्पादन अपेक्षित असते. मागील काही वर्षांत सोयाबीनने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्वाधिक क्षेत्र व्यापले असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. हे व्यापक क्षेत्र लक्षात घेऊन काँग्रेसने महायुतीवर टीका करण्यासाठी सोयाबीनचा मुद्दा प्रचारात अग्रस्थानी ठेवला आहे. महायुती सरकारवर टीका करताना राहुल गांधी यांनीही सोयाबीनचा मुद्दा लावून धरला आहे. महायुतीने जाहीर केलेल्या सहा हजार रुपये प्रति क्विंटलची घोषणा पुढे नेत सात हजार रुपये केली आहे.

दरम्यान, सोयाबीनच्या भावावरून काँग्रेसवर टीका करताना अनिल बोंडे म्हणाले की,  काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे अमरावती जिल्ह्यातील तिवसाला आले. सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटलचे दर देऊ म्हणाले. एक शेतकरी या नात्याने देशातील सोयाबीनचे भाव पाहिले. संपूर्ण कर्नाटकात ३,८०० रुपयांपेक्षा सोयाबीनला भाव नाही. खर्गे यांच्या गुलबर्ग्याच्या बाजारात हे भाव दिले जात आहेत. तरीही कर्नाटक सरकार दखल घेत नाही, सोयाबीनची खरेदी करीत नाही. ‘भावांतर’ योजनाही राबवित नाही. खर्गे मात्र निवडणुकीच्या प्रचारासाठी येऊन खोटे बोलतात. लोकांची फसवणूक करतात. आपल्या गावातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कमी भावाची चिंता करीत नाहीत, अशी टीका भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच हजार रुपये प्रति हेक्टरी सोयाबीन उत्पादकांना मदत दिली होती. आता भावांतर योजना लागू करून हमीभावापेक्षा कमी दरातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणार आहेत. असे काही तरी कर्नाटकच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना खर्गे यांनी सांगावे, असा टोलाही डॉ. बोंडे यांनी लगावला आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसAgriculture Sectorशेती क्षेत्रAnil Bondeअनिल बोंडे