शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 17:38 IST

Maharashtra Assembly Election 2024 : "जग एवढे पुढे गेले, पण भारतीय जनता पक्षवाले अजून 'बटेंगे तो कटेंगे'मध्येच अडकलेले आहेत."

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत टोलेबाजी करताना दिसत आहेत. यातच आता, "जग एवढे पुढे गेले, पण भारतीय जनता पक्षवाले अजून 'बटेंगे तो कटेंगे'मध्येच अडकलेले आहेत. दुनिया खूप पुढे गेली आहे," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटलील यांनी भाजपला  लगावला आहे. एवढेच नाही तर, "...याचा अर्थ क्लिअर आहे. भारतीय जनता पक्षाच्या ५० पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत," अशी भविष्यवाणीही त्यांनी यावेळी केली. ते बीडमध्ये प्रचारसभेत बोलत होते.

काय म्हणाले जयंत पाटील? -पाटील म्हणाले, "काळ बदललेला आहे. जातीवर आणि धर्मावर हे निवडणूक नेत आहेत. "बटेंगे तो कटेंगे" म्हणणाऱ्यांना मी एवढेच सांगतो की, ही अठराव्या-एकोणिसाव्या शतकातली भाषा आहे. आपण आता २१ व्या शतकात आलोय. २१ व्या शतकात लोकं फार पुढे गेली आहेत. ते इलॉन मस्क नावाचा एक माणूस आहे, जगातल्या सगळ्या नव्या नव्या संशोधन करून प्रयोग करण्याचा त्याचा हातखंडा आहे. तो आता काय विचार करतोय माहिती आहे का? तो विचार करतोय की, मंगळावर इंटरनेट कसं चालू करता येईल? याचा विचार पृथ्वीवर, इलॉन मस्क करतोय आणि त्यासाठी आता प्रयोग करण्याचं काम त्यांनी सुरू केलेले आहे. जग एवढं पुढे गेलं, पण भारतीय जनता पक्ष वाले अजून 'बटेंगे तो कटेंगे' मध्ये अडकलेले आहेत. दुनिया खूप पुढे गेली आहे." 

जयंत पाटील पुढे म्हणाले, "अमित शहा आणि ते योगी आदित्यनाथ इथे येऊन असल्या घोषणा करतात. त्या योगींना माहीत नाही की, यांचा निम्मा उत्तर प्रदेश मुंबई आणि पुण्यात नोकरीला आलाय यांचा आणि आम्हाला येऊन शिकवताय की "बटेंगे तो कटेंगे". याचा अर्थ क्लिअर आहे. भारतीय जनता पक्षाच्या ५० पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटलील यांनी भाजपला लगावला आहे."

इंदिरा गांधी असत्या, तर... -बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा आणि मंदिरांवरील हल्ल्याचा उल्लेख करत जयंत पाटील म्हणाले, "अरे, तुमचा नेता विश्वगुरु झालाय ना? शेजारच्या बांगलादेसला दम देऊन हिंदूंवरचे अत्याचार थांबवता आले नाहीत? इंदिरा गांधी असत्या, तर त्या बांगलादेशवर हल्ला केला असता आणि तिथल्या हिंदूंचे संरक्षण केले असतं."

"निवडणूक जवळ आली की धर्मावर निवडणूक न्यावी, असे कधी वाटते भाजपला? ज्यावेळी लक्षात येते की, जमणे जरा अवघड आहे, इलेक्शन जरा अवघड झाले आहे, हे आता त्यांच्या लक्षात आले आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Jayant Patilजयंत पाटीलyogi adityanathयोगी आदित्यनाथAmit Shahअमित शाहBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस