शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 16:38 IST

उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांना पक्षातून बाहेर काढलं आहे. 

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटातील ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यात भिवंडी येथील माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचा समावेश आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघ महाविकास आघाडीकडून समाजवादी पक्षाला सोडण्यात आला. त्यात तिथले माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष निवडणुकीत अर्ज दाखल केला. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी अर्ज मागे घेतला. तरीही पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे रुपेश म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील विश्वास नांदेकर, जिल्हाप्रमुख वणी विधानसभा, चंद्रकांत घुगूल, झरी तालुकाप्रमुख, संजय आवारी- मारेगाव तालुकाप्रमुख, प्रसाद ठाकरे, वणी तालुकाप्रमुख यांचीही पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

रुपेश म्हात्रेंनी केला होता गंभीर आरोप

अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर  माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. रुपेश म्हात्रे म्हणाले होते की, पक्षात फूट झाली त्यानंतर आम्ही पक्षाची एकजूट करण्यासाठी मी सर्व काही केले आहे. लोकसभेत आम्ही ताकद वाढवली. आमच्या पक्षाने ठरवला तो खासदार आम्ही निवडून दिला, लोकसभेत आमच्यावर अन्याय झाला. आता विधानसभेत जागावाटपाटतही आमच्यावर अन्याय झाला. २०१४ मध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुलाला निवडून यावं म्हणून कपिल पाटील यांचं काम आम्हा सर्वांना करावं लागलं. आता देखील तीच परिस्थिती आहे. वांद्रे आणि वरळीमध्ये मदत व्हावी म्हणून या ठिकाणी मुस्लिम उमेदवारी किंवा समाजवादीचा उमेदवार देण्यात यावा, अशापद्धतीने कुठेतरी त्यांच्या राजकारणासाठी आमचा प्रत्येकवेळी बळी देण्याचं काम होत  आहे. भिवंडीवर नेहमी अन्याय केला जात आहे. हेच यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी केले आहे, आता उद्धव ठाकरेही करत आहेत असा आरोप त्यांनी केला होता.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी