शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 21:19 IST

उमरखेड मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराविरोधात पक्षातच बंडखोरी, माजी आमदाराने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. 

यवतमाळ - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तिकिट विकल्याचा आरोप करत माजी आमदार विजय खडसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमरखेड मतदारसंघातून विजय खडसे इच्छुक होते. मात्र याठिकाणी काँग्रेसनं साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माजी आमदार नाराज झाले आहेत. 

विजय खडसे यांनी म्हटलं की, मी पक्षाकडे तिकिट मागितले तेव्हा ज्याचं सर्व्हेत नाव येईल त्यांना उमेदवारी मिळेल असं नाना पटोलेंनी सांगितले, माझे नाव सर्व्हेत एक नंबरला असताना मला उमेदवारी नाकारण्यात आली. मला नाकारल्याचं दु:ख नाही परंतु या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार पक्षाने दिला. स्थानिक उमेदवाराला डावलण्यात आले. जो उमेदवार पक्षाने दिला तो भ्रष्ट अधिकारी मोपलवार यांचा मानसपुत्र असलेल्या माणसाला दिली याची खंत आहे. बाहेरचा उमेदवार देण्यामागे काँग्रेसला संपवण्याचं षडयंत्र पटोलेंनी केलंय का अशी शंका आहे. २१ इच्छुकांनी उमेदवारी मागितली, परंतु स्थानिकांना डावलून मुंबईत राहणाऱ्या मोपलवारचं काम करणाऱ्या माणसाला ही उमेदवारी देण्यात आली असा आरोप त्यांनी केला.

तसेच  खऱ्या अर्थाने हा काँग्रेसवर फार मोठा अन्याय आहे. अमरावती विभागात ५ मतदारसंघापैकी २ उबाठा, २ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला दिले. उमरखेड एकमेव मतदारसंघ असा काँग्रेसकडे होता जिथे १०० टक्के निवडून येण्याची संधी होती. परंतु स्थानिक इच्छुकांना डावलून बाहेर बाहेरच्या उमेदवारी दिली म्हणजे काँग्रेस विकली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मी नाना पटोलेंना म्हणालो, सर्व्हेत मी नंबर एकला आहे. तरीही त्यांनी ऐकले नाही. जे सर्व्हेचे निकष लावले त्याचे पुढे झाले काय...? असा सवालही माजी आमदारांनी उपस्थित केला. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकांमध्ये फिरून १० हजार किमी चालून जागरुक दिली. गांधी नेहरू यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम नाना पटोले करतायेत. अनेक ठिकाणच्या तक्रारी नानाभाऊंबद्दल आहे. काँग्रेस पक्षाशी प्रामाणिकपणे काम करणारे माझ्यासारखे लोक आहेत. हा अन्याय सहन करण्यापलीकडचा आहे. पक्षश्रेष्ठींनी याची दखल घ्यावी. माणिकराव ठाकरे यांचा हा मतदारसंघ ज्यांनी या राज्याचे नेतृत्व केले, संयमी, शांत माणुसकीचा माणूस. मात्र मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत असणाऱ्या या माणसाला बाहेर काढण्यासाठी द्वारवा मतदारसंघ उबाठा देण्याचे काम केले. उमरखेड मतदारसंघ उबाठाला देऊन द्वारवा मतदारसंघ माणिकराव ठाकरे यांना दिला असता तर ते निवडून आले असते. नाना पटोलेंनी सुपारी घेऊन काँग्रेस संपवतायेत असा आरोप त्यांनी केला.

कोण आहेत विजय खडसे?

विजय खडसे हे २००९ साली उमरखेड मतदारसंघातून विजयी झाले होते. २०१४ साली भाजपाच्या राजेंद्र नजरधने यांनी त्यांचा पराभव केला. २०१९ मध्ये पुन्हा एकदा विजय खडसेंना काँग्रेसने उमेदवारी दिली. परंतु ९२७८ मतांनी खडसेंचा पराभव झाला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४umarkhed-acउमरखेडvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरे