शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
3
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
4
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
5
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
6
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
7
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
8
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
9
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
10
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
11
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
12
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
13
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
14
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
15
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
16
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
17
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
18
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
19
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
20
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना

भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 20:37 IST

महायुती ५ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या असून त्यातील भाजपाने ४ आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून १ जागा आतापर्यंत सोडण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आतापर्यंत १४६ जागांवर उमेदवार जाहीर केलेत. त्यानंतर आता भाजपाने ४ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्याचं समोर आले आहे. बडनेरा, गंगाखेड, कलिना आणि शाहूवाडी मतदारसंघ भाजपाने त्यांच्या मित्रपक्षांना सोडले आहेत. त्यामुळे महायुतीत भाजपाच्या जागांची संख्या आता १५० इतक्या झाल्या आहेत. 

माहितीनुसार, बडनेरा ही जागा रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडण्यात आली आहे. तर गंगाखेड महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडली आहे. कलिना जागा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी सोडली आहे. शाहूवाडी मतदारसंघ हा विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला सोडली आहे. अशाप्रकारे ४ जागा भाजपाने मित्रपक्षांना सोडल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

महादेव जानकर पुन्हा महायुतीत?

काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली. राष्ट्रीय समाज पक्ष हा २०१४ च्या आधीपासून भाजपासोबत महायुतीमध्ये होता. अनेकदा दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले तर जानकर महायुतीसोबत कायम होते.  लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना महायुतीने परभणी लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता रासपला विधानसभेची एक जागा सोडल्यामुळे महादेव जानकर पुन्हा महायुतीत परतणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. 

दरम्यान, महायुतीत रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला २ जागा सोडण्यात आल्याची माहिती आहे. त्यात भाजपाने कलिना मतदारसंघ तर शिवसेना शिंदे गटाकडून धारावी मतदारसंघ सोडण्यात आलेली आहे. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत. विधानसभेच्या २ जागांसह भविष्यात काही महामंडळेही देण्याचं आश्वासन रामदास आठवलेंना महायुतीकडून देण्यात आले आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४badnera-acबडनेराkalina-acकालिनाdharavi-acधारावीshahuwadi-acशाहूवाडीgangakhed-acगंगाखेडMahadev Jankarमहादेव जानकरBJPभाजपाRamdas Athawaleरामदास आठवलेRavi Ranaरवी राणा