शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

'बीडमधील बोगस कामगार प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार', कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 20:43 IST

Maharashtra Assembly budget session 2026: कामगार विभागाने राज्यभरात दक्षता पथकांच्या माध्यमातून ४६ ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत, बीड प्रकरणातही स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच, उपलब्ध पुरावे सादर करण्याचे आवाहन करत, दोषींवर शंभर टक्के कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली.

मुंबई - कामगार विभागाने राज्यभरात दक्षता पथकांच्या माध्यमातून ४६ ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत, बीड प्रकरणातही स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच, उपलब्ध पुरावे सादर करण्याचे आवाहन करत, दोषींवर शंभर टक्के कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली.

बीड जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान बोगस मृत कामगार दाखवून कोट्यवधींचा अपहार झाल्याच्या आरोपाबाबत विधानसभेत सदस्य सुरेश धस यांनी लक्षवेधी सूचना मांडली.

उत्तर देताना कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी सांगितले की,  राज्यात काही ठिकाणी बोगस एजंटांकडून बनावट कागदपत्रे आणि खोटे सही-शिक्के तयार करून शासनाच्या योजनांचा गैरफायदा घेतला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा प्रकारांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नसून दोषी अधिकारी, संबंधित संस्था किंवा इतर कुणीही असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

पूर्वी कामगार नोंदणी प्रक्रिया ऑफलाइन असल्यामुळे अशा गैरप्रकारांना वाव होता. ही त्रुटी दूर करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून त्यात बायोमेट्रिक प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे.

मंत्री फुंडकर यांनी सांगितले की, २०२० ते २०२६ या कालावधीत बीड जिल्ह्यात ११५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी एक अपघाती मृत्यूचा अर्ज खरा आढळला असून उर्वरित ११४ अर्जांची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत ५३ प्रकरणांमध्ये अनियमितता आढळलेली नाही, तर उर्वरित प्रकरणांची पडताळणी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed Bogus Labor Case: Inquiry and Action, Minister Fundkar Assures

Web Summary : Minister Fundkar promised investigation and action in Beed's bogus labor case involving crores embezzled via false death claims. 46 cases are already filed. Online registration with biometrics now prevents fraud. 114 applications being checked, 53 found regular so far, others pending verification.
टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBeedबीड