‘अमेरिका-इराणमधील युद्धाचा विधान भवन उडवून देण्याच्या धमकीशी संबंध आहे का?’ विजय वडेट्टीवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:08 IST2026-03-12T16:05:36+5:302026-03-12T16:08:03+5:30

Maharashtra Assembly Budget Session 2026: मुंबईतील विधानभवन,मुंबई उच्च न्यायालय,बीएसई आणि मेट्रोला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या प्रकरणाची सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.

Maharashtra Assembly Budget Session 2026: ‘Is the US-Iran war related to the threat to blow up the Vidhan Bhavan?’ Vijay Vadettiwar asks | ‘अमेरिका-इराणमधील युद्धाचा विधान भवन उडवून देण्याच्या धमकीशी संबंध आहे का?’ विजय वडेट्टीवार यांचा सवाल

‘अमेरिका-इराणमधील युद्धाचा विधान भवन उडवून देण्याच्या धमकीशी संबंध आहे का?’ विजय वडेट्टीवार यांचा सवाल

मुंबई - मुंबईतील विधानभवन,मुंबई उच्च न्यायालय,बीएसई आणि मेट्रोला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या प्रकरणाची सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.  सध्या अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा या धमकीशी सबंध आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी येणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

औचित्याच्या माध्यमातून बोलताना वडेट्टीवार म्हणाले,हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागे कोणती शक्ती आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खलिस्तानी संघटनेचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. जर अशा महत्त्वाच्या ठिकाणांना उडवून देण्याच्या धमक्या येत असतील, तर हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सध्या अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा या धमकीशी सबंध आहे का? आंतरराष्ट्रीय पातळीवर ताणले गेलेल्या संबंधांमुळे भारतात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. गृहविभागाने या प्रकरणाचा तपास करून या ई-मेलचा उगम शोधून काढावा आणि यावर तातडीने सभागृहात निवेदन करावे, अशी आग्रही मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Web Title : विधान भवन उड़ाने की धमकी: क्या यह अमेरिका-ईरान से संबंधित है?

Web Summary : विजय वडेट्टीवार ने सवाल किया कि क्या मुंबई में बम धमाकों की धमकी अमेरिका-ईरान तनाव से जुड़ी है। उन्होंने विधानसभा सत्र के दौरान खुफिया विफलता और संभावित अंतरराष्ट्रीय संबंधों पर चिंता जताते हुए ईमेल की उत्पत्ति की जांच का आग्रह किया।

Web Title : Threat to blow up Vidhan Bhavan: Is it related to US-Iran?

Web Summary : Vijay Wadettiwar questions if bomb threats to Mumbai landmarks are linked to US-Iran tensions. He urges investigation into the email's origin, citing concerns about intelligence failure and potential international connections during the assembly session.