शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

दुर्मिळ घटना ! कमी दाबाच्या क्षेत्राचा बंगालचा उपसागर ते अरबी समुद्रापर्यंत प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 6:43 AM

मुंबईसह कोकण, गुजरातच्या किनारपट्टी भागात १८ व १९ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

ठळक मुद्दे१९७७ नंतरची दुसरी दुर्मिळ घटना : दुर्मिळ बदल, पावसाळा लांबला कोकणाला दुसऱ्यांदा चक्रीवादळा इतक्याच भयंकर पावसाला सामोरे जाण्याची वेळ

विवेक भुसे - पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाच्या क्षेत्राचा थेट अरबी समुद्रापर्यंत जाण्याची दुर्मिळ घटना यंदा प्रथमच घडत आहे. त्यामुळे ‘निसर्ग’ चक्रीवादळानंतर या हंगामात कोकणाला दुसऱ्यांदा चक्रीवादळा इतक्याच भयंकर पावसाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. १२ नोव्हेबर १९७७ नंतर तब्बल ४३ वर्षानंतर ही घटना घडत आहे. 

बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशाच्या जवळ निर्माण झालेले हे कमी दाबाचे क्षेत्र १३ ऑक्टोबरला विशाखापट्टणम येथे किनारपट्टीवरुन पुढे सरकले. त्याने तेलंगणा, हैदराबादहून पुढे बुधवारी महाराष्ट्रात प्रवेश केला. ताशी २० किमी वेगाने ते पुढे सरकत आहे. सोलापूर मार्गे ते पुढे पुणेवरुन अरबी समुद्रात जाण्याची शक्यता आहे. 

याबाबत ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे कमी दाबाचे क्षेत्र आता मध्य महाराष्ट्रापर्यंत आले आहे. ते गुरुवारी अथवा शुक्रवारी अरबी समुद्रात प्रवेश करेल. तेथे त्याला बाष्प मिळाल्याने त्याची तीव्रता आणखी वाढून ते उलटे फिरेल. त्यामुळे मुंबईसह कोकण, गुजरातच्या किनारपट्टी भागात १८ व १९ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कमी दाबाचे क्षेत्र हे जमिनीवर आल्यावर त्याला बाष्पाचा पुरवठा होत नसल्याने ते काही काळातच विरुन जाते. पण, गेल्या ३ महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने जमिनीत भरपूर ओलावा आहे. त्यामुळे या कमी दाबाच्या क्षेत्राला आवश्यक बाष्पाचा पुरवठा होत आहे़ त्यातूनच त्याचा प्रवास अरबी समुद्रापर्यंत होणार आहे. 

यापूर्वी १२ नोव्हेबर १९७७ रोजी अशाच प्रकारची घटना घडली होती. चिन्नईजवळील नागापट्टणम येथे चक्रीवादळाने जमिनीवर प्रवेश केला व ते केरळला अरबी समुद्रात जाऊन मिळाले. तेथे त्याला अरबी समुद्रातून पुन्हा बाष्प मिळाल्याने त्याची तीव्रता आणखी वाढून ते उलट फिरले. त्यामुळे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर तेव्हा मुसळधार पाऊस पडला होता.  त्यावेळचे चक्रीवादळ होते़ आताचे कमी दाबाचे क्षेत्र आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान