शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

प्रेम कुणावरही (न) करावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:38 AM

‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीद्वारे संचालित महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना चक्क प्रेमात न पडण्याची शपथ देण्यात आली आणि मोठा गदारोळ सुरू झाला.

‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीद्वारे संचालित महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना चक्क प्रेमात न पडण्याची शपथ देण्यात आली आणि मोठा गदारोळ सुरू झाला. राजकीय नेत्यांपासून महिला समाजसुधारक या प्रकाराविरोधात एकत्र आले. प्रसारमाध्यमांमध्ये मथळेच्या मथळे कॉलेजविरोधी वृत्तांनी भरून गेले. महिलांचे अधिकार, त्यांना दिलेली दुय्यम वागणूक, संविधानाचा अपमान हे शब्द प्रत्येकाच्या मुखात कमीअधिक प्रमाणात होतेच.  प्रेमविवाह आणि थयथयाट !वरकरणी पाहता कोणालाही ही घटना निषेधार्ह वाटेल, यात शंका नाही; पण घडलेली घटना किती सत्य आहे, त्यात किती तथ्य आहे, हे जाणून घेण्याची जबाबदारी ही प्रत्येकाने घेतली पाहिजे. मुळात महाविद्यालयाने शपथ दिली असे म्हणण्यापेक्षा त्या विद्यार्थिनींनी स्वमर्जीने प्रेम व प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली, असे म्हणावे लागेल. याचे कारण असे की, महाविद्यालयाने अशा प्रकारची शपथ घेण्यात येणार आहे; ज्याला ती घ्यायची आहे, त्यानेच तिथे उपस्थित राहावे, असे आवाहन अगोदरच केले होते. कोणावरही जबरदस्ती नव्हती. ज्या मुलींना तेथे यायचे होते, त्या तिथे आल्या व शपथ घेऊन आपला निर्धार व्यक्त केला. हे त्या मुलींचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य नव्हे का? त्यांना शपथ घेण्यापासून परावृत्त करणे, हा घटनेचा अवमान नव्हे का? याचाही विचार विरोधकांनी करायला हवा.      पालकांच्या इच्छेनुसार आपले लग्न व्हावे, असा विचार लेकीने का करू नये? किंबहुना प्रत्येक आईबाबांना आपल्या मुलीचा जोडीदार उत्तम असावा; तिचे आयुष्य सुखात जावे, असे नक्कीच वाटते. त्यादृष्टीने योग्य काळजी घेणे, हा त्या जन्मदात्यांचा अधिकार आहे आणि कर्तव्यही! असे असतांना माझे माझ्या आई-वडिलांवर प्रेम आहे, मी त्यांच्या मताचा आदर करीन’ अशी शपथ एखाद्या लेकीने घेतली, तर तिने आपल्या पालकांविषयी दाखवलेला विश्वास व आदर नक्कीच स्पृहणीय आहे. त्या मुलींनी जी शपथ घेतली, त्यात असलेले एक वाक्य जाणीवपूर्वक दुर्लक्षिले गेले. ते म्हणजे 'सभोवताली घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. सभोवताली घटना म्हणजे निर्भयावर झालेला बलात्कार, खून, सोशल मीडियाद्वारे झालेली ओझरती ओळखसुद्धा तरुणींच्या आयुष्याची राखरांगोळी करायला पुरेशी ठरते. दिवसेंदिवस लग्नाचे आमिष दाखवून केलेले बलात्कार समाजमन हेलावून सोडतात.महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात दिलेल्या महितीनुसार, २०१३ ते २०१७ या चार वर्षात केवळ मुंबईतून २६ हजारांपेक्षा अधिक मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी २२६४ जणींचा शोध लागलेला नाही. केरळच्या एका चर्चने केलेल्या आरोपात ‘लव्ह जिहाद’चा उल्लेख करून खळबळ उडवून दिली आहे. सुशिक्षित तरुणींनाही प्रेमाच्या जाळ््यात ओढून त्यांचा वापर अतिरेकी कारवायांत केला जाण्याचे प्रकार उघड झाले आहेत. असे असताना प्रेमविवाहासारखा मार्ग सध्या विनाशाकडे जाणारा असू शकतो, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. याच काळजीपोटी महाविद्यालयाने या तरुणींना सावध होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले, असेच म्हणावे लागेल. शिवाय मी भावी माता म्हणून माझ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही, व मुलीसाठी हुंडा देणार नाही अशा प्रकारचे खºया अर्थाने पुरोगामी असणारे विचार या शपथेच्या माध्यमातून रुजवणाºया या महाविद्यालयाच्या दूरदृष्टीचे, तेथील प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थिनींचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. ‘प्रेमविवाह वाईट आहे’ असे म्हणण्याचा इथे प्रयत्न नाही, फार प्राचीन काळापासून या देशात प्रेमविवाह झालेले आहेत. साक्षात श्रीकृष्णाने आपली बहीण सुभद्रेचा विवाह वीर अर्जुनाशी लावून दिला होता. इथेच खरी मेख आहे. सध्या अर्जुन म्हणून आपला भावी आयुष्याचा जोडीदार निवडत असताना त्या अर्जुनाच्या बुरख्याआड कोणी दुर्योधन किंवा दु:शासन तर लपलेला नाही ना ? याचा शोध घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना आपल्या पालकांना विश्वासात घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. दुर्दैवाची गोष्ट अशी की, इतके उदात्त विचार मांडणाºया महाविद्यालयाला फुटकळ दुष्प्रचाराला बळी पडून माफी मागावी लागते. याबद्दल समाजाने अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो’ एवढेच म्हणावे लागेल. - नयना भगत(लेखिका सनातन संस्थेच्या प्रवक्त्या आहेत.)   ढाई अक्षर प्रेम का...ढाई अक्षर प्रेम का आणि व्हॅलेंटाइन डे ची शपथ संत कबीराने किती यथार्थ संदेश या दोह्यात दिला आहे. तो म्हणतो अडीच अक्षरांचा हा शब्द, प्रेम ज्याला उमगला तो पंडित, तो सुजाण.‘पोथी पढ पढ जगमुआ भया न पंडित कोय,ढाई अक्षर प्रेम का पढा सो पंडित होय’‘खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी’‘प्रेम वरदान स्मर सदा’... अशा अनेक गीतांतून निसर्गसुंदर प्रेमाबद्दल भावना व्यक्त झाल्या आहेत. परंतु, आजकाल गंगा उलटी वाहत आहे. प्रेमाच्या जागी द्वेषाचे-तिरस्काराचे उदात्तीकरण केले जात आहे. अशा विषारी वातावरणाचा एक नमुना परवाच्या व्हॅलेंटाइन डे ला अमरावतीच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये दिसून आला. कॉलेजातील किशोरींना ‘आम्ही प्रेम करणार नाही व प्रेमविवाह करणार नाही’, अशी शपथ शिक्षकांनी दिली. या उपक्रमाला प्रसिद्धीही बरीच मिळाली. मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे म्हणे, ते चिंतित झाले! हे शपथेचे औषध तर रोगापेक्षा भयंकर म्हटले पाहिजे. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी असाच प्रकार. (ही शपथ कितीजण पाळतात, यावर भविष्यात संशोधन करण्यास हरकत नाही. अत्याचारांसंबंधाने त्यांची स्थिती आजमावणेही मोलाचे ठरेल.) स्त्रिया, मुली व लहानलहान बालिकांवरील अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे, हे तर खरेच. उद्या याहून भीषण घटना होणार नाहीत, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. इतकी गंभीर परिस्थिती आहे. निर्भया, असीफा, तेलंगणातील व्हेटरनरी डॉक्टर, हिंगणघाटची प्राध्यापिका... किती तरी अशी प्रकरणे कशाची द्योतक आहेत? समाजात वाढलेल्या हिंसाचारी प्रवृत्तींची आणि विकारी मनोवृत्तीची लक्षणे आहेत. शिवाय, त्यामागे स्त्रीला कस्पटासमान मानणे, उपभोगण्याची आणि मालकीची एक वस्तू मानणे ही पुरुषसत्ताक विचारपरंपराही आहे. त्यामध्ये परिवर्तन कसे घडवता येईल, यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे आणि स्त्रियांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्राधान्याने प्रभावी उपाययोजना काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. त्याउलट मुलींनाच जबाबदार धरण्याचा गर्भित हेतू या शपथ उपक्रमामागे दिसून येतो. हे निश्चित खेदजनक आणि निषेधार्ह आहे. ‘आम्ही अन्याय सहन करणार नाही, कोणावरही डोळ्यांदेखत अन्याय होत असेल तर बघ्याची भूमिका न घेता त्वरेने योग्य साहाय्य अन्यायग्रस्त व्यक्तीस देऊ,’ असा निर्धार प्रत्येक मुलीने, स्त्रीने, इतकेच नव्हे तर समंजस पुरूषाने करणे ही काळाची गरज आहे. असे असताना ही मंडळी एकदम प्रेमविवाहावर का बरे घसरली असतील? खरेतर, प्रेमविवाहाविरोधाचे हे जुने औषध नव्या बाटलीतून देऊन परंपरेची खुंटी हलवून घट्ट केली जात आहे. एखादी लस द्यावी त्याप्रमाणे ही शपथ आपला समाज आपल्याला सतत देत आला आहे. आपल्याच धर्मात, आपल्याच जातीत - पोटजातीत विवाह झाला पाहिजे हा आज्ञावजा उपदेश घरोघरी कायम दिला जातो. काही अपवादात्मक व्यक्ती तो झुगारून कुटुंबाचा, समाजाचा रोष पत्करून प्रेमाशी आपली बांधीलकी निभावतातही. पण एकंदरीत पाहता, परजातीत रोटी-बेटीचा व्यवहार खपवून घेतला जाणार नाही, यावर समाज कायम कटाक्ष ठेवतो. मुख्य मेख इथेच आहे. जात टिकवायची असेल तर स्त्रीला आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य देऊन जातीच्या कक्षेबाहेर पडू देण्यास परंपरागत समाज अजिबात तयार नाही.आता जुने कायदे संपुष्टात आले आहेत, पण त्यांचे जोखड जनमानसावर आहे. आता नवे वारे वाहायला हवेत. जातीयवाद नाकारून सामाजिक समता शिरोधार्ह मानणारे आपले संविधान आपल्या हाती येऊन ७० वर्षे झाली आहेत. आता तरी आपण बदलले पाहिजे ही नव्या युगाची हाक आहे. काही प्रमाणात ते घडतही आहे. जसजशी स्त्रियांना शिकण्याची, व्यवसायाची, विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवण्याची संधी मिळत आहे, तसतशी निरनिराळ््या जाती-धर्मांतील तरूणांना भेटण्याची, समजावून घेण्याची व त्यांच्याशी अर्थपूर्ण नाते निर्माण करण्याचीही संधी मिळते आहे. तेवढ्या प्रमाणात जातीव्यवस्थेची बंधने निखळू लागली आहेत. मुली सुजाण व धीट होत आहेत, तर मुले समंजस, संयमी आणि संवेदनशील असे सकारात्मक संस्कार विद्यार्थीदशेत, किशोरवयात करणे शक्य आहे. वरवरचे आकर्षण, मैत्री, घनिष्ठ प्रेम यातील फरक समजावून डोळसपणे प्रेम करण्यास प्रवृत्त करता येईल. हा मार्ग न चोखाळता मान खाली घालून वावरा, आई-वडील सांगतील त्याच्याशी आपापल्या जातीत विनातक्र ार लग्न करा आणि जातीपातीचे रहाटगाडगे बिनबोभाट चालू ठेवण्याची शपथ दिली जात आहे. अशा उपक्रमामागील खरा हेतू समजून घेऊन धडाडीच्या तरूणी जेव्हा शपथा घेण्यास नकार देतील आणि तरूण त्यांना साथ देतील, तेव्हा समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचे घटनाकारांचे स्वप्न साकार होण्यास सुरूवात होईल.- गीता महाजन(लेखिका भारतीय महिला फेडरेशन, ठाणे समितीच्या सेक्रेटरी आहेत)महाविद्यालयातील मुलींना प्रेमविवाह करू नये, अशी शपथ दिल्याची बातमी ऐकल्यावर धक्का बसला. आपण खरोखरच आधुनिक जगात आहोत की प्राचीन युगात, यावरच विश्वास बसेना. जग कुठे चालले आहे आणि आपण काय करीत आहोत, असा प्रश्न पडला. डोळसपणे प्रेमविवाह करण्याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्यानंतर भविष्यात होणाऱ्या सर्व परिणामांना मुलीला सामोरे जावे लागते. यातून अनेक हिंसक घटना घडल्याचे ऐकतो. त्यामुळे मुलींनी प्रेमविवाह करण्यापूर्वी आईवडिलांना पूर्वकल्पना दिली, तर विरोधाची धार नक्कीच कमी होईल.- पूजा बिष्णोई, उल्हासनगरप्र्रेमविवाहाबाबत मुलींना दोषी ठरविणे हे चुकीचे आहे. प्रेमविवाहांकडे आजही समाजात चुकीच्या नजरेने पाहिले जाते. अनेक प्रेमविवाहांमध्ये मुलींनाच दोषी ठरविले जाते. ग्रामीण भागात तर काही घरांमध्ये मुलींनी प्रेमविवाह केल्याने त्यांचे उत्तरकार्य उरकल्याच्या घटनाही घडल्या आहेत. प्रेमविवाह न करण्याबाबत मुलींना शपथ देणे योग्य नाही. अशा शपथांमुळे प्रेमविवाहासारख्या घटना कितपत रोखल्या जातील, हा प्रश्नच आहे.- संदेश पाटील, भिवंडीराज्यघटनेने सर्वांना समान हक्क दिल्याने मुलींनी प्रेमविवाह करू नये, अशी शपथ देणे योग्य नाही. हा प्रकार राज्यघटनेच्या विरोधात आहे. मुलीच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखे आहे. मुलीना शिक्षण देऊन त्यांना पायावर उभे करणे हे आईवडिलांचे कर्तव्य आहे. तसेच मुलीने प्रेमविवाह करताना त्यांना विश्वासात घेतले तर कदाचित भविष्यात पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही. मुलींना मार्गदर्शन करणे, चांगल्यावाईटची समज देणे हे आईवडिलांसह शिक्षकांचे कर्तव्य आहे. मात्र, प्रेमविवाह करू नये, अशी सरसकट शपथ देणे चुकीचे आहे.- विश्वास इंगळे, उल्हासनगरप्रेम करायला हरकत नाही, पण ते खरे, निर्मळ आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता असायला हवे. पण तशी उदाहरणे अलीकडे दुर्मीळ झाली आहेत. शारीरिक आकर्षणापोटी प्रेम केले जात असल्याचे दिसून येत असून अलीकडे व्यभिचार वाढत आहे. देशात भोगवादी संस्कृती बोकाळत चाललेली आहे. भारतीय संस्कृतीची बंधने कोणीही पाळत नाही, ही खंत आहे. गर्लफ्रेण्डचा जमाना आहे. प्रेमाचे चाळे उघड्यावर दिसून येत असून त्यामुळे समस्या वाढत आहे. हे समाजाला घातक आहे.- अजय संभुस, डोंबिवलीप्रेमविवाह करणार नाही, अशी शपथ घेणे किंवा शपथ देणे, हेच चुकीचे आहे. शपथ घेऊन कोणी आपले निर्णय घेत नाही. त्यापेक्षा प्रेमविवाह करताना सहकारी कसा आहे, याचा अंदाज घेतल्यावर विवाहाच्या दिशेने वाटचाल करावी. आधी मित्र आणि नंतर जीवनसाथी निवडणे, हा मार्ग सोपा आणि सोयीचा ठरू शकतो. थेट प्रेम करून विवाह करणे आणि त्यानंतर स्वभाव जुळत नाही म्हणून वाद घालणे चुकीचे आहे. त्यामुळे प्रेमविवाह करताना त्या विवाहाच्या आधीच सर्व गोष्टींची कल्पना घेणे, हे योग्य आहे.- गीतांजली यादव, बदलापूरप्रेमविवाह हा स्वभाव आणि एकमेकांच्या विचारांवर टिकणारा आहे. स्वभाव जुळत असेल आणि एकमेकांचे विचार पटत असतील तर प्रेमविवाह शक्य आहे. मात्र, प्रेमविवाह करणार नाही, अशी शपथ घेणे योग्य नाही. प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. अनेक विवाह असेदेखील आहेत की, जे कुटुंबाच्या मर्जीने घडतात, मात्र टिकत नाहीत. दुसरीकडे अनेक प्रेमविवाह टिकले आहेत. अशा परिस्थितीत विवाह कोणत्या पद्धतीने झाला, याचा विचार करण्यापेक्षा तो कसा टिकविता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे.- कुणाल सचदेव, अंबरनाथप्रेमविवाह करू नये, अशी शपथ देणे चुकीचे आहे. आजकालची पिढी स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते. त्यांचे काही चुकत असेल तर मोठ्यांनी त्यांना मार्गदर्शन करावे. पण शपथ घेऊन बंधनात अडकवू नये. चांगल्या वाईट गोष्टी घडल्याशिवाय अनुभव मिळत नाही. प्रतिष्ठेसाठी ‘सैराट’सारख्या गोष्टी घडू नये, याचेही समाजाला भान असावे. सोशल मीडिया व इतर काही माध्यमांमुळे आताची पिढी ही चुकीच्या मार्गावर जात आहे. त्यांचे समुपदेशन करुन त्यांच्या भवितव्यासाठी काय चांगले याची जाणीव करून द्यावी.- ज्योती पवार, डोंबिवलीप्रेमविवाह करू नये, अशी शपथ देणे अयोग्य आहे ते नैतिकतेला धरून नाही. जर शपथ द्यायचीच आहे तर केवळ मुलींनाच का दिली गेली? मुलांनाही द्यायला हवी होती. मुलगा आणि मुलगी भेद का आणि किती दिवस चालणार. हिंसा अत्याचार याच भेदामुळे होतो. आपण लहानपणापासून मुलगा आणि मुलगी असा भेद करतो. उलटपक्षी मुलांना स्त्रियांचा आदर करायला, तिला व्यक्ती म्हणून वागवायला शिकवा.- सागर उतेकर, डोंबिवलीमला ही शपथ योग्य वाटत नाही. प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि संविधान ते बहाल करते. आपण अशी बंधने लादून पुन्हा महिलांना गुलाम असल्याची जाणीव करून देतो की काय, असे वाटते आहे. प्रेमविवाह केल्याने जे लोक हिंसा आणि अत्याचार करतात ते लोक मानसिकदृष्ट्या प्रबळ नसतात. सर्व जाती-धर्माच्या समाजाला एकत्र बांधायचे असेल तर जातीभेदाची तेढ आंतरजातीय विवाह करूनच नष्ट होईल. आपण प्रेम विवाहाला संमती दिली तर नक्कीच कोणतेही प्रेमीयुगुल पळून जाऊन लग्न करणार नाहीत. पण स्वत:चे इगो जपण्यासाठी मानसिकता ढासळलेले काही लोक चुकीचे वर्तन करीत असतात.- संघरत्न घनघाव, शहापूरमुलींनी प्रेमविवाह करू नये, असे मी कधीच म्हणणार नाही. याउलट, ‘त्या’ तरुणींना माझे सांगणे आहे की, आपला जोडीदार निवडताना सगळ्या गोष्टींचा बारीक विचार करूनच निर्णय घेणे योग्य आहे. तुम्हाला त्या जोडीदारासोबत आयुष्य घालवायचे आहे. तो निर्व्यसनी तर हवाच, त्यासोबत तुम्ही घरच्यांशी बोलून त्यांना विश्वासात घेऊन पुढचे पाऊल उचला, जेणेकरून प्रेमविवाह लपून केल्यानंतर त्याचे पडसाद क्रूर आणि विकृत पद्धतीने उमटणार नाहीत.- रेश्मा घाटेसाव, कल्याणएकविसाव्या शतकात मुलींसह महिलांबाबत अनेक गैरसमज समाजात आहेत, हेच या देशाचे दुर्दैव आहे. इतर प्रगत देशांमध्ये मुलींना, महिलांना अशी पुरुषी बंधने तुलनेने कमी असल्यानेच आज ते देश प्रगत झाले आहेत. त्यातच प्रेमासारखा विषय हा त्या मुलीचा वैयक्तिक आणि खासगी विषय आहे. आजच्या घडीला मुलीला प्रेमविवाहाला विरोध करणे आणि त्याबाबत शपथ देणे हे चुकीचे आहे. मात्र हिंसा, अत्याचारांबाबत बोलायचे तर प्रेमविवाहामुळे हिंसा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात घडते, हे सत्य नाकारता येणार नाही.- वर्षा पाटील, भिवंडीप्रेमविवाह हा मुळात मुलामुलीच्या सहमतीने होत असतो. यात मुलगा अथवा मुलगी असा निष्कारण भेद करणे चुकीचे आहे. अत्याचार आणि हिंसा हे त्या प्रत्येक व्यक्तीवर निर्भर असते. केवळ मुलींना प्रेमविवाह करण्यापासून रोखणे हे मूर्खपणाचे आहे. समाजाने अधिक बंधने ही स्त्रियांवर लादली आहेत. आपण योग्य जोडीदार निवडला तर कोणताही विवाह हा यशस्वीच होतो.- श्रेया कर्पे, डोंबिवलीभारतीय घटनेनुसार प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. तरूणांनी प्रेम हे जपून केले पाहिजे. ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्याची नीट पारख केली पाहिजे. एखाद्या महाविद्यालयातून मुलींना प्रेमविवाह करू नये, अशी शपथ घ्यायला लावणे, ही गोष्ट योग्य वाटत नाही. आपल्या देशात जातीपातीचे राजकारण असल्याने आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली जात नाही. आंतरजातीय विवाहामुळे हिंसेला खतपाणी घातले जात आहे.- अभिलाष पगारे, डोंबिवलीप्रेमविवाह व गांधर्वविवाह ही भारतवर्षातील अतिप्राचीन, कौतुकास्पद व सर्वमान्य प्रथा राहिली आहे. स्वयंवराद्वारे स्वत:च्या मर्जीने विवाह करण्याचा अधिकार आपली अर्वाचीन संस्कृती स्त्रियांना देते. पार्वती, कुंती, सुभद्रा, संयोजिता अशा अनेक उदाहरणांचे आपण कौतुकच करतो. मात्र प्रेम, शृंगार, वासना, लैंगिक आकर्षण, उच्छृंखलपणा यातील फरक समजून घेण्याची कुवत प्रेमीयुगलांत असणे अत्यंत आवश्यक आहे. -प्रदीप सामंत, मीरा रोडमुलींना प्रेमविवाह करणार नाही, अशी शपथ द्यायला लावली हा प्रकारच मुळात व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे. ठरवून जोडलेले सर्वच वैवाहिक संबंध कायम टिकतात असे नाही तसेच सर्वच प्रेमविवाह वाईट असतात हे मानणे चुकीचे आहे. जीवनात आनंद व सुख दु:खात साथ देणारी व्यक्ती ही प्रेमाचीच असते. आजच्या काळात निर्मळ प्रेमापेक्षा वासना व स्वच्छंदवृत्ती वाढली आहे. शाळकरी मुलांमध्ये शारीरिक आकर्षण आहे. त्यामुळे महाविद्यालय व शाळांनी मुलामुलींना लैंगिक शिक्षणासह त्यांच्या होणाऱ्या मानसिक बदलांबाबत शिक्षण दिले पाहिजे. - दीपिका पाटील, भार्इंदरमुलींनी प्रेमविवाह करू नये, अशी शपथ देणे अयोग्य आहे. मुलांवर जसे संस्कार होतील तसा समाज तयार होईल आणि जसा समाज तयार होईल, तसे राष्ट्र तयार होईल. कोणत्याही प्रकारचे अत्याचार हे विचारधारेवर अवलंबून असतात. प्रेमभावना कुणीही रोखू शकत नाही, ती एक ऊर्जा आहे.- दिलीप भाबड, मीरा रोडअशा शपथा देऊन व घेऊन आज समाजात घडणाºया घटना थांबणार आहेत का? विश्वासाने केलेले प्रेम नक्कीच सफल होते. दोन व्यक्तींच्या या संबंधात त्यांच्या योग्य निर्णयाला मान देणे ही आपली संस्कृती आहे. प्रेमभावना यशस्वीपणे हाताळणे, फार गुंतागुंतीची असली तरी अशक्य नक्कीच नाही. एकत्रित शिक्षण घेण्याच्या या युगात कॉलेजमध्ये शिकणे ही कल्पनाच खूप सुखद आहे. अशावेळी मुलामुलींच्या वागण्यातील ठळक बदल जाणीवपूर्वक न तपासता केवळ संशयावरून असे भावनिक निर्बंध घालणे योग्य नाही. - चंदाराणी कुसेकर, ठाणेमुलींनी प्रेमविवाह करावे की करू नये हा मुद्दाच चुकीचा आहे. मुळात समाज अशा मानसिक आजारामधून कधी मुक्त होणार कुणास ठाऊक? अशा शपथ पद्धतीला आधी त्या मुलींनीच विरोध केला पाहिजे. जिथे अशा शपथ जाणीवपूर्वक आणि कडवट विचारातून येतात तिथे सर्व समाजातून त्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त होणे गरजेचे होते. गप्प बसणे म्हणजेच मूक संमती दर्शवणे. अशाच विषारी विचारधारेमधून स्त्रीने जर प्रेमविवाह केलाच तरी काही प्रमाणात हिंसाचार आणि हल्ले होते राहतात. मुलीने आपले नाक कापले ही भावना तीव्र असते मग त्यांना समोरचा जीव हा स्वत:च्या आयुष्याचा भाग होता हे सुद्धा गौण वाटते. नक्कीच समाज हा बुरसट मानसिकतेचा बळी आहे. सर्व समाज त्यात सहभागी नसला तरी बºयाच अंशी अशा विषारी विचारांची डोकी जास्त आहे.- हनिफ तडवी, ठाणेमुलींनी प्रेमविवाह का करू नये? अशी शपथ देणे योग्य वाटते का? तर अजिबात योग्य वाटत नाही. ही चूक आहे असे सांगणे गरजेचे आहे. अशा प्रकारची शपथ घेणारे भावनाशून्य आहेत. मुलींना मन आहे, भावना आहेत. आवडीनिवडीचा अधिकार आहे आणि हल्लीच्या मुली तर प्रत्येक गोष्टीत सुजाण आहेत. आपल्यासाठी योग्य व्यक्ती कोण असू शकतो याची जाणीव असणाºया आहेत. त्यामुळे प्रत्येक स्त्री असो की पुरु ष यांना समाजात स्वतंत्र जगता आले पाहिजे आणि प्रेमविवाह होत असतील तर समाजाने ते मान्य केले पाहिजेत. कुटुंबाचे सामाजिक स्थान टिकवण्यासाठी जबरदस्तीच्या नात्यात अडकवणे अगदी चुकीचे आहे. जातीपातीच्या बंधनात अडकलेल्यांकडूनच जातीबाहेर विवाह केल्यामुळे हिंसाचार केला जातो. हे सर्वार्थाने निषेधार्ह आहे.- पूनम गायकवाड-पगारे, ठाणेमुलींनी प्रेमविवाह करू नये अशी शपथ देणे अजिबात योग्य नाही. कारण प्रेमविवाह हा दोन जीवांना प्रेमाच्या माध्यमातून, जाती-धर्माच्या भिंती तोडून जवळ आणतो. परंतु जुळवलेले लग्न हे परंपरेच्या दबावातून दोन अनोळखी लोकांना जबरदस्तीने जवळ आणते. अशा लग्नात निखळ प्रेमाच्या ओलाव्यापेक्षा लादलेले प्रेम असते. अशी लग्ने आपापल्या जाती-धर्मातच मर्यादित असल्याने तसेच यात खानदान, प्रतिष्ठा, पैसा या मूल्यांना महत्व असल्याने त्यातून जातीय-धार्मिक ऐक्य साधले जाण्याची शक्यता नाही. प्रेमविवाहामुळे हिंसा, अत्याचार घडत नाहीत, तर या विवाहास असलेल्या पारंपरिक विरोधामुळे व बुरसटलेल्या विचारसरणीमुळे घडतात.- उत्तम जोगदंड, कल्याणअठराव्या शतकातील वर्णव्यवस्थेचा पाया २१ व्या शतकात पुन्हा रोवण्यासाठी ‘प्रेमविवाह’ म्हणजेच आंतरजातीय विवाह ही एक मोठी भिंत धर्मांध शक्तींसाठी अडथळा होऊन उभी राहिली असावी. ही भिंत हटविण्यासाठी ‘प्रेमविवाहाने हिंसा वाढते’ असे जनतेला भ्रमित करून गैरसमज पसरविण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मुलीने प्रेमविवाह करू नये अशी शपथ देणे आणि प्रेमविवाहामुळे हिंसा होते, हे पसरवणे हे सगळे थोतांड असून धर्मांध शक्तींचा हा कुटील डाव आहे.- मिलिंद राऊत, नवी मुंबईएकतर्फी प्रेमातून तरु ण मुलींच्या हत्या, अ‍ॅसिडहल्ले होत असतील तर हे कसले प्रेम? हा अभिनिवेश व गडचिरोली जिल्ह्यात एका तरु णीने प्रेमविवाह केल्यानंतर तिच्या आई, वडील आणि भावाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना हे पाहता आपण किती दिवस केवळ मुलींचेच मॉरल पोलिसिंग करणार आहोत? शपथ केवळ मुलींनाच का? मुलांनाही द्यायला हवी. ‘मी कोणत्याही मुलींकडे वाकड्या नजरेने बघणार नाही, तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा, तिच्या मताचा, नकाराचा पूर्ण आदर करेन’, हे मुलांना आपण कधी शिकविणार आहोत? नकार पचविण्याचे संस्कार, महिलांबद्दल आदराची भावना मुलांमध्ये घरांपासून दृढ व्हायला हवी. - अ‍ॅड. राजकुमार पाटील, मुरबाडहोय, मुलींनी प्रेमविवाह करता कामा नये. कारण, ज्या आईवडिलांनी आपल्या मुलींना लहानाचे मोठे केले असते, त्यांच्या काही इच्छाआकांक्षा असतात. त्याकडेही लक्ष दिले पाहिजे. विवाहाचा निर्णय आईवडिलांच्या इच्छेने घेतला तर हिंसाचार होत नाही.- सुमित काळे, कल्याण

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डे