शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ सिंधुदुर्गचा आज स्नेहमेळावा

By admin | Updated: February 20, 2015 23:09 IST

आठवा वर्धापनदिन : सावंतवाडीत ‘मेक इन सिंधुदुर्ग’ विशेषांकाचे प्रकाशन

सावंतवाडी : वाचकांच्या पाठबळावर पे्रम, जिव्हाळा आणि विश्वासार्हतेची परंपरा जपत सिंधुुदुर्ग जिल्ह्यात ‘लोकमत’ची दमदार वाटचाल सुरू आहे. स्नेहाचा हा झरा अखंड वाहता रहावा, यासाठी ‘लोकमत’ सिंधुदुर्ग आवृत्तीच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त आज, शनिवारी सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त सायंकाळी जिल्ह्यातील निवडक संघांची ग्रुप डान्स व सोलो डान्स स्पर्धा होणार आहे. ‘लोकमत’च्या दमदार वाटचालीत वाचक, हितचिंतक व वृत्तपत्र विक्रेते, एजंट, जाहिरातदार व समाजातील प्रत्येकाने प्रेमाचा वर्षाव केला आहे. या जिव्हाळ्याचे बंध आणखी दृढ व्हावेत, या उद्देशाने आज सायंकाळी पाच वाजता स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. आठव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत सावंतवाडी येथे विशेषांक प्रकाशनानंतर ग्रुप व सोलो डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्नेहमेळाव्याच्या ठिकाणीच स्पर्धा होणार आहे. निरपेक्ष वृत्तीने जपलेल्या नीतीमूल्यांचा आदर केल्यामुळेच वाचकांच्या मनाचा ठाव घेण्यात आणि यशाचे उत्तुंग शिखर गाठण्यात ‘लोकमत’ परिवार यशस्वी ठरला आहे. कोकणच्या संपन्न परंपरेप्रमाणे प्रेमाने समृध्द झालेला हा परिवार नवचैतन्य, उत्साहानिशी नव्या वाटचालीस सज्ज झाला आहे. या वाटचालीत सर्वांच्या प्रोत्साहनाची आवश्यकता वाटते, म्हणूनच वर्धापनदिनाचा मुहूर्त साधत ‘लोकमत’ परिवाराने स्रेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. प्रत्येक क्षेत्रातील घटकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने केले आहे. (वार्ताहर)‘मेक इन सिंधुदुर्ग’ विशेषांकवर्धापनदिनानिमित्त ‘मेक इन सिंधुदुर्ग’ हा विशेषांक आज प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यातून जिल्ह्याच्या सामाजिक, उद्योग, आरोग्य, कृषी, शैक्षणिक, आदी क्षेत्रातील वाटचाल, भविष्यातील चित्र यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. जिल्ह्याचे बदलते रूप आणि अपेक्षांचा ऊहापोह याद्वारे करण्यात आला आहे.