शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2025: ह्या नेत्यानी पाडलाय महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव; कोण ठरणार प्रभावशाली राजकारणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 22:34 IST

Lokmat Maharashtrian of the year Awards 2025: लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यावर्षी या पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. त्यात, प्रभावशाली राजकारणी या कॅटेगरीसाठीची नामांकनं अशी....

चंद्रशेखर बावनकुळे(महसूलमंत्री, भाजप, नागपूर)- १२ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. अडीच वर्षांत तीन वेळा महाराष्ट्र पिंजून काढला.- आठवड्यातील एक दिवस घरी थांबून उर्वरित सहा दिवस सतत प्रवास करण्याचा संकल्प पूर्ण.- अठरा तास काम करणे ही ओळख निर्माण केली. शेतकऱ्याला समृद्ध करणारे इथेनॉल प्रोजेक्टला मंजुरी दिली.- शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा वीज देणे हा महत्त्वाचा निर्णय घेतला.- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे आरक्षण पुन्हा मिळवून दिले.- संघटन मजबूत करणे, निवडणूक जिंकण्यासाठी आखलेल्या रणनीतीमुळे २०२४ मध्ये भाजपला यश मिळाले.

राधाकृष्ण विखे पाटील(जलसंपदामंत्री, भाजप, अहिल्यानगर)- १९९५ पासून सलग ८ वेळा शिर्डी विधानसभेतून विजयी. १० वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी, अकरावी ऑनलाइन प्रवेश, शालेय स्कूल बस धोरण हे धाडसी निर्णय घेतले.- दुधाला प्रति लिटर ३४ रुपये भाव, जनतेला सहाशे रुपये ब्रासने वाळू देणे असे महत्त्वाचे निर्णय घेतले.- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजदराने कृषी कर्ज दिले. २०८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेतले.- अहिल्यानगरमध्ये नवीन औद्योगिक वसाहती निर्माण केल्या.

संजय शिरसाट(सामाजिक न्यायमंत्री, शिवसेना-शिंदे गट, छत्रपती संभाजीनगर)- रिक्षाचालक, कंपनीत हेल्पर ते शिवसेनेचे मंत्री असा जीवनप्रवास- कुटुंबात राजकीय पार्श्वभूमी नसताना सक्रिय राजकारणात यश मिळविले. शिवसेनेतील प्रवेशानंतर त्यांच्या आक्रमकतेला खऱ्या अर्थाने धार आली.- पक्षासाठी आंदोलने करताना लाठ्या-काठ्या खाल्लेल्या आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आले आहेत.- सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ता अशी दुहेरीजबाबदारी आहे. शिवसेना पक्ष फुटीनंतरएकनाथ शिंदे यांना भक्कम साथ दिली. 

सुप्रिया सुळे(खासदार, राष्ट्रवादी शरद पवार गट -बारामती, पुणे)- २००६ मध्ये राजकारणात प्रवेश. २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ असे सलग चार वेळा बारामती लोकसभेतून विजयी.- सामाजिक क्षेत्रात विविध पदे भूषवीत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या ७० व्या आमसभेत अन्न सुरक्षेबाबत भारताची भूमिका मांडली.- स्त्रीभ्रूण हत्येविरोधात 'जागर जाणिवांचा तुमच्या माझ्या लेकींचा' हा उपक्रम राज्यभर राबविला.- आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींसाठी 'उमेद' उपक्रम राबविला. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली.- राष्ट्रीय वयोश्री योजनेचा बारामती मतदारसंघातील २० हजार नागरिकांना लाभ देऊन देशात प्रथम क्रमांक घेतला. उदय सामंत(उद्योगमंत्री, शिवसेना - शिंदे गट, रत्नागिरी)- १९९७ साली राजकारणात आले आणि १९९९ मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले.- रत्नागिरी विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेस (२००४-२००९), शिवसेना (२०१४ - २०१९) आणि शिंदेसेना (२०२४) असे सलग ५ वेळा निवडून आले- महाविकास आघाडी सत्तेत उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री झाले.- राज्यातील विद्यापीठांना भेटी देऊन महाविद्यालयांचे प्रश्न मार्गी लावले.- दावोस येथे उद्योगमंत्री म्हणून त्यांनी केलेले करार महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाचे.- उद्योगमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पुन्हा दावोस येथे विक्रमी करार केले आहेत.

विश्वजित कदम(आमदार, काँग्रेस, सांगली)- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस ते राज्यमंत्री असा प्रवास.- गेल्या २० वर्षात काँग्रेस पक्ष संघटन कार्यात सक्रिय, पक्ष देईल ती जबाबदारी निभावणारा संघटक नेता ही ओळख.- दोन वेळा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, संघटनेतून आलेला कार्यकर्ता असल्याने यांची कार्यशैली अधिक प्रभावी आहे.- अफाट जनसंपर्क, शक्तिशाली संघटक, प्रश्न सोडवण्याची हातोटी आहे.- अडीच वर्षाच्या राज्यमंत्रिपदाच्या काळात राज्यातील आणि पलूस कडेगाव मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले.

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSupriya Suleसुप्रिया सुळेSanjay Shirsatसंजय शिरसाटUday Samantउदय सामंतVishwajeet Kadamविश्वजीत कदम