Exclusive: नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर; हर्षवर्धन सपकाळ होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 05:32 IST2025-02-13T05:31:21+5:302025-02-13T05:32:04+5:30

हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत

Lokmat Exclusive: Nana Patole resignation accepted; Harshvardhan Sapkal to be Congress state president | Exclusive: नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर; हर्षवर्धन सपकाळ होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

Exclusive: नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर; हर्षवर्धन सपकाळ होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

आदेश रावल

नवी दिल्ली - विधानसभेतील पराभवानंतर आता काँग्रेसकडून महाराष्ट्रातील संघटनेत बदल करण्यात येत आहे. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष केले जाऊ शकते. सपकाळ हे सचिन राव व मीनाक्षी नटराजन यांच्या जवळचे मानले जातात. 

काँग्रेस नेतृत्वाला असे सूचित करण्यात आले की, ज्या नेत्याचा कोणताही व्यवसाय नाही अशा नेत्याला प्रदेशाध्यक्ष करावे. तिसऱ्यांदा आमदार झालेले विश्वजित कदम यांना काँग्रेस नेतृत्व विधिमंडळ पक्षाचे नेते बनविण्यावर विचार करत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाना पटोले यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

राजकीय कारकीर्द अशी...

हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिरांचे आयोजन, ग्रामस्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीतील सक्रिय सहभाग असा व्यापक अनुभव आहे. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी ‘जलवर्धन’ हा जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबवून त्याची उपयुक्तता सिद्ध केली. 

Web Title: Lokmat Exclusive: Nana Patole resignation accepted; Harshvardhan Sapkal to be Congress state president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.