लोकमान्य टिळक अध्यासनातर्फे ‘अंन्शियंट इंडियन मॅथेमॅटिक्स ’ ग्रंथ साकार होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 11:30 AM2019-08-01T11:30:53+5:302019-08-01T11:32:54+5:30

लोकमान्य टिळक हे एक ‘गणिततज्ञ’ देखील होते हे खूप कमी जणांना माहिती आहे. तसेच टिळकांनी संशोधनाद्वारे नक्षत्रांच्या स्थितीवरून वेदांचा काळ ठरविला होता

Lokmanya Tilak study centre will be create of 'Ancient Indian Mathematics' book | लोकमान्य टिळक अध्यासनातर्फे ‘अंन्शियंट इंडियन मॅथेमॅटिक्स ’ ग्रंथ साकार होणार

लोकमान्य टिळक अध्यासनातर्फे ‘अंन्शियंट इंडियन मॅथेमॅटिक्स ’ ग्रंथ साकार होणार

googlenewsNext
ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक अध्यासनाचा पुढाकार

पुणे :  स्वातंत्र्यसेनानी, तत्वज्ञ, संपादक, लेखक अशी लोकमान्य टिळक यांची जनमानसात ओळख असली तरी ते एक  ‘गणिततज्ञ’ देखील होते हे खूप कमी जणांना माहिती आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना  ‘गणित’ हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता. टिळकांनी संशोधनाद्वारे नक्षत्रांच्या स्थितीवरून वेदांचा काळ ठरविला होता. त्यामुळे प्रामुख्याने लोकमान्य टिळक अध्यासनातर्फे गणित विषयावर अधिक भर दिला जात आहे. अध्यासनामार्फत  ’बीजगणित’,‘नंबर थिअरी’ या विषयांवर संशोधन सुरू असून,  टिळकांच्या स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून  ‘अँंन्शियंट इंडियन मॅथेमॅटिक्स’या ग्रंथाची निर्मिती केली जाणार आहे. 
सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या लोकमान्य टिळक अध्यासनाचे प्रमुख शशिकांत कात्रे यांनी‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या वर्षी  ‘अँंन्शियंट इंडियन मॅथेमॅटिक्स ’ याअंतर्गत 24 आॅनलाईन व्याख्यानांची मालिका सादर केली होती. याअंतर्गत विविध गणित विषयक संशोधकांची व्याख्याने ठेवण्यात आली होती.  गणितामधली ‘पायथागोरस’ ची पद्धत शाळांमध्ये शिकविली जाते. इ.स पूर्व 500 च्या काळातील पायथागोरसचा हा सिद्धांत असला तरी त्यापूर्वी  ‘शैवसूत्र’ लिहिली गेली आहेत. त्यामध्ये याचा उल्लेख आहे. कर्णाचा वर्ग दोन्ही बाजूच्या बेरजेएवढा असतो हे त्याचे सूत्र आहे. पण नंतर त्यालाच पायथागोरसचे नाव दिले गेले. मूळ संस्कृत श्लोक घेऊन त्याचा अर्थ सांगून पायथागोरसचा सिद्धांत पूर्वी आपल्याकडे कसा होता?अशा स्वरूपाची उदाहरण देऊन व्याख्यानाची मांडणी करण्यात आली. 
आजमितीला टिळकांची ‘ओरायन’वगैरे सारखी पुस्तक प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांचे पुनर्मुद्रण करण्यापेक्षा ’अँंन्शियंट इंडियन मँथेमँटिक्स’या शीर्षकांतर्गत  नव्याने ग्रंथ लिहिला जाणार आहे. शैवसूत्रापासून ते भास्कराचार्यांपर्यंत जे गणित विकसित होत गेलं ते कसं झाल? त्यात महावेदाचार्य, श्रारंगाचार्य, आर्यभटट होते त्यांनी गणिताच्या पद्धती कशा मांडल्या त्यांचा समावेश केला जाईल. भास्कराचार्यांनी संपूर्ण गणित एकत्र केलं. त्यांची दोन पुस्तके माहिती आहेत  ‘लीलावती’ आणि‘बीजोपनयन’.त्यांची ‘ग्रहगणिताध्याय’आणि‘गोलाध्याय’ ही पुस्तके फारशी अवगत नाहीत. या व्याख्यानांच्या मालिकेत या दोन पुस्तकांवर अधिकांश भर दिला गेला. प्राचीन गणिती पद्धती  समोर आणण्याचा प्रयत्न या ग्रंथाच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे कात्रे यांनी सांगितले. 
सध्या गणिताची व्याप्ती खूप वाढली आहे. ’डिस्ट्रिक मॅथेमॅटिक्स ’ सारखे संगणकाशी निगडित विषय आलेले आहेत. अभ्यासक्रमांमध्येही त्याचा समावेश आहे. आधीचा पाया धरूनच पुढील संशोधन करावे लागते. विद्यापीठाचे लोकमान्य टिळक अध्यासन आणि गणित विभाग यांच्यामार्फत गणिताच्या विविध विषयांवर संशोधन सुरू असल्याचेही ते म्हणाले. 
--------------------------------------

Web Title: Lokmanya Tilak study centre will be create of 'Ancient Indian Mathematics' book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.