शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 19:22 IST

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार बीड आणि अहमदनगर मतदारसंघामध्ये अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit Poll Results 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी  देशभरातील ५४३ जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडेवारी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. अशातच आता एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात बीड आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बीडमध्ये शरद पवार गटाला तर नगर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता एक्झिट पोलच्या आकडेवारीतून समोर आलं आहे.

बीड लोकसभा मतदारसंघामधून पंकडा मुंडे बाजी मारण्याची शक्यता आहे. टीव्ही९ पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार पंकजा मुंडे या बीडमधून बाजी मारण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यामुळे आता या एक्झिट पोलनुसार बजरंग सोनावणे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. जातीय ध्रुवीकरणामुळे हा मतदारसंघ भाजपला अवघड जाणार अशी चर्चा सुरु होती. मात्र एक्झिट पोलनुसार ही जागा भाजपला सुटताना दिसत आहे.

मराठवाड्यामध्ये सुरु असलेलं मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा या सगळ्याचा बीडमधल्या निवडणुकीवर मोठा परिणाम दिसून आला. मराठवाड्यात दोन गट पडल्याने बीडमधील निवडणूक ही चुरशीची होती. बीडमध्ये मुंडे कुटुंबियांचे असलेला दबदबा आणि महायुतीचे बळ याचा पंकजा मुंडे यांना फायदा झाल्याचे एक्झिट पोलमधून दिसून येत आहे. 

दुसरीकडे, अहमदनगरमध्ये विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. टीव्ही९ पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे आघाडीवर आहेत. निलेश लंके हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच निलेश लंके हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवार यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर  लंके यांना अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी देखील मिळाली होती. त्यानंतर आता एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, निलेश लंके हे आघाडीवर आहेत तर भाजपचे सुजय विखे पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Pankaja Mundeपंकजा मुंडेnilesh lankeनिलेश लंकेbeed-pcबीडSujay Vikheसुजय विखेAhmednagarअहमदनगर