'दिल्लीचं विमानाचं तिकीट २० हजारांत अन् भाजपचं १०० कोटीला'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:57 IST2019-04-01T16:56:54+5:302019-04-01T16:57:36+5:30
२०१४ मध्ये 'अच्छे दिन आने वाले है' म्हटले होते. त्यानंतर आता 'सबका साथ सबका विकास', असं सांगितलं जात आहे. २०१६ मध्ये मोदींनी 'न्यू इंडिया'ची घोषणा केली. २०१७ मध्ये 'मेरा देश बदल रहा है', २०१८ मध्ये 'साफ नियत सही विकास', २०१९ मध्ये 'मै भी चौकीदार'ची घोषणा यांच्याकडून करण्यात येत आहे. परंतु, लोक चौकीदार चोर असल्याचे सांगतात, असंही अमित देशमुख यांनी सांगितले.

'दिल्लीचं विमानाचं तिकीट २० हजारांत अन् भाजपचं १०० कोटीला'
मुंबई – भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी १०० कोटी रुपये मोजावे लागत असल्याचा घणाघाती आरोपी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमधील अहमदपूर येथे काँग्रेसेचे उमेदवार मच्छिंद्र कामंत यांच्या प्रचारासाठी आयोजित काँग्रेसच्या सभेत ते बोलत होते.
सध्या पेपरमध्ये जाहिरातींचा भडीमार आहे. मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण सुरू आहे. देशाच्या इतिहासात भाजपने दाखवून दिलं की, सत्ता पक्ष काय-काय चुकीचं करू शकतो. लातूरहून दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेचं तिकीट ५ हजार रुपये आहे. लातूरहून दिल्लीला विमानाने जाण्याचं तिकीट २० हजार रुपये आहे. पण लातूरहून दिल्लीला जाण्याचं भाजपचं लोकसभेचं तिकीट १०० कोटी रुपयांना मिळत असल्याचा आरोप अमित देशमुख यांनी केला. तसेच यांची चौकशी होणे गरजेचे आहे. ही लोकशाहीची आणि मतदारांची चेष्टा असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी अमित देशमुख यांनी भाजपवर सडकून टीका करताना म्हटले की, २०१४ मध्ये 'अच्छे दिन आने वाले है' म्हटले होते. त्यानंतर आता 'सबका साथ सबका विकास', असं सांगितलं जात आहे. २०१६ मध्ये मोदींनी 'न्यू इंडिया'ची घोषणा केली. २०१७ मध्ये 'मेरा देश बदल रहा है', २०१८ मध्ये 'साफ नियत सही विकास', २०१९ मध्ये 'मै भी चौकीदार'ची घोषणा यांच्याकडून करण्यात येत आहे. परंतु, लोक चौकीदार चोर असल्याचे सांगतात, असंही अमित देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे, युवकांच्या हाताला काम हवं आहे. परंतु, यांनी 'मै भी चौकीदार'ची घोषणा सुरू केली. ज्यांनी पारदर्शकतेच्या गप्पा हाणल्या अशा भाजपपासून सावध राहण्याचा सल्ला यावेळी आमित देशमुख यांनी दिली.